Home /News /national /

Diwali 2020: दिवाळीत फटाके फोडले, तर भरावा लागेल 1 लाखांचा दंड

Diwali 2020: दिवाळीत फटाके फोडले, तर भरावा लागेल 1 लाखांचा दंड

प्रदूषण पसरवणाऱ्यांना 1 कोटींचा दंड भरावा लागू शकतो. एवढंच नाही, तर प्रदूषण पसरवण्यास कारणीभूत ठरल्यास एक कोटीच्या दंडासह, 5 वर्षांची शिक्षादेखील होऊ शकते.

  नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात कमी झालेलं प्रदूषण आता अनलॉकमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागलं आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. यासाठी एका आयोगाची स्थापनाही करण्यात आली आहे. आता प्रदूषण पसरवणाऱ्यांना 1 कोटींचा दंड भरावा लागू शकतो. एवढंच नाही, तर प्रदूषण पसरवण्यास कारणीभूत ठरल्यास एक कोटीच्या दंडासह, 5 वर्षांची शिक्षादेखील होऊ शकते. गुरूवारी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील अनेक भागात, हवेची गुणवत्ता मोठ्या गंभीर स्तरावर पोहचली. त्यामुळे लोकांना श्वास घेणंही कठीण झालं होतं. त्यामुळे आता केंद्र सरकारने दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि यूपीतील वायू प्रदूषण पाहता एका आयोगाची स्थापना केली आहे. हे आयोग वायू प्रदूषण रोखण्यासाठी, त्यावर उपाय सुचवण्यासाठी आणि प्रदूणषाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी काम करणार आहे. यात एका चेयरपर्सनसह, केंद्र सरकार, एनसीआर राज्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि इस्त्रोचेही प्रतिनिधी असणार आहेत. हे आयोग, EPCA अर्थात एनव्हायरर्मेंट पॉल्यूशन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल अथॉरिटीची जागा घेईल. (वाचा - Loan Moratorium: कसा आणि किती मिळणार या व्याजमाफीचा फायदा, सरकारनं दिलं उत्तर) दिल्लीत आतिशबाजी केल्यास - प्रदूषणाविरोधातील लढ्यात अनेक अभियान चालवले जात आहेत. असं असतानाही अनेक ठिकाणी बेजबाबदारपणा होत असल्याचं चित्र आहे. हे पाहता, दिल्ली सरकार ग्रीन दिल्ली ऍप लाँच करणार आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असताना, सरकारने कडक पावलं उचलली आहेत. ग्रीन क्रॅकर्सशिवाय, इतर कोणतेही फटाके उडवल्यास 1 लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. सरकार यासाठी 11 टीमची स्थापना करत आहे.

  (वाचा - पुढील 4 दिवसात बदलणार LPG घरगुती गॅस सिलेंडरबाबतचा हा नियम, वाचा सविस्तर)

  नोव्हेंबर महिन्यापासून ही टीम काम सुरू करणार आहे. दिल्लीची हवा खराब न होऊ देण्याबाबत सुप्रीम कोर्टानेही आदेश दिले आहेत. गरजेचं नसल्यास फटाके उडवू नये आणि प्रदूणष कमी करण्यास मदत करावी, असं आवाहन मंत्री गोपळ राय यांनी केलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Air pollution, Diwali 2020

  पुढील बातम्या