एकही सुट्टी न घेता सगळ्यांसाठी अहोरात्र केलं काम, पण उपचाराआधीच कोरोना योद्ध्यानं गमावले प्राण

एकही सुट्टी न घेता सगळ्यांसाठी अहोरात्र केलं काम, पण उपचाराआधीच कोरोना योद्ध्यानं गमावले प्राण

हिरा लाल यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणं दिसली. मात्र उपचारानंतर एका आठवड्यातच त्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : देशात कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवत वाढत आहेत. कोरोनाचा धोका आता वैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांमध्ये जास्त जाणवू लागला आहे. अशाच एक दिल्लीतील एम्स (AIIMS, DELHI) रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कोरोनानं मृत्यू झाला. रुग्णालयात सॅनिटाइजर सुपरव्हायजर (Senior sanitation supervisor) म्हणून काम करणारे हिरा लाल यांचा मृत्यू 25 मे रोजी झाला. हिरा लाल यांना गेल्या मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. मुख्य म्हणजे कोरोनाच्या संकटात त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती.

हिरा लाल निर्जंतुकीकरण कर्मचारी, सफाई कामगार आणि वॉर्ड बॉय यांच्यासोबत काम करत असत. त्यांना सफाई कामगार आणि वॉर्ड मुलांबरोबर सतत संपर्कात रहावे लागले. यातून त्यांना कोरोनाचं संक्रमण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हिरा लाल यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणं दिसली. मात्र उपचारानंतर एका आठवड्यातच त्यांचा मृत्यू झाला. एम्स नवी दिल्ली येथील एससी आणि एसटी एसोसिएशनचे सरचिटणीस कुलदीप सिंह म्हणाले की, जेव्हा हिरा आजारी पडले तेव्हा लगेचच त्यांनी चाचणी करण्यात आली.

कुलदीप सिंग म्हणाले की, एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना घरी जाऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता आणि लक्षणे वाढल्यास त्यांनी रुग्णालयात परत यावे असे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. हिरा लाल यांच्याकडे सुरक्षा उपकरणेही नव्हती, असे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सुरक्षा उपकरणांचा अभाव

कुलदीप सिंग यांनी सांगितले की, जे लोकं या संकटात स्वच्छता आणि इतर महत्त्वाची कामं करतआहे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. त्यांना सुरक्षा उपकरणं उपलब्ध करून द्यावीत. रुग्णालयात शेक़डो कर्मचारी आहेत जे, जीव धोक्यात टाकून काम करत आहेत.

हिरा लाल यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न

ट्रिब्यून इंडिया डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड-19चा प्रसार वाढत असतानाही हिरा लाल स्वत: काम करत होते. हसतमुख आणि उत्साहपूर्ण भावनेने एम्समधील वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांचे स्मरण केले. आता त्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु यामुळं रूग्णालयात सतत धोक्यात येत असलेल्या सफाई कामगारांच्या सुरक्षेच्या उपायांबद्दल बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी एम्सचे माजी एचओडी (मेडिसिन) जेएन पांडे यांचेही कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.

First published: May 26, 2020, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading