भररस्त्यात मारली गोळी, मग काढला मृतदेहाचा फोटो; थरकाप उडवणारा मर्डरचा LIVE VIDEO

भररस्त्यात मारली गोळी, मग काढला मृतदेहाचा फोटो; थरकाप उडवणारा मर्डरचा LIVE VIDEO

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा पिस्तूल घेऊन धावताना दिसत आहे. धावत येऊन एका व्यक्तीला गोळी मारून हा तरुण पळून जाताना दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : देशाची राजधानी दिल्लीतील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. दिवसाढवळ्या भररस्त्यात गुन्हे होत आहेत. अशीच एक घटना दिल्लीतील द्वारका परिसरात घडली. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ थक्क करणारा आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा पिस्तूल घेऊन धावताना दिसत आहे. धावत येऊन एका व्यक्तीला गोळी मारून हा तरुण पळून जाताना दिसत आहे. त्यानंतर मृतहेदाचा फोटो काढून फरार होतो. या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

वाचा-विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीनं दिली धमकी, घाबरून तरुणीची आत्महत्या

वाचा-भिवंडीत बायपास रस्त्यावरील लॉजवर छापा; 3 महिलांची सुटका, दलालांविरोधात कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती विकास परिसरातील आहे. तर ज्या व्यक्तीनं गोळी मारली तो गुंड आहे. कमल गहलोत असे त्याचे नाव आहे. या दोघांमध्ये वाद असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोळी मारल्यानंतर कमल गहलोत फरार झाला. पोलिसांनी आरोपीचे वडील पवन यांना अटक केली आहे.

वाचा-पत्नीनेच रचला नवऱ्याला नपुंसक बनवण्याचा प्लॅन, कारण ऐकून पोलीसही हैराण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन गहलोत आणि त्यांचा मुलगा कमल यांनी मिळून हा कट रचला होता. हत्येनंतर कमल फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तर, दुसरा आरोपी पवन याची चौकशी केली जात आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर द्वारका परिसरातील अन्य घटनांविषयीही महत्त्वाची माहिती मिळू शकेल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 28, 2020, 11:20 AM IST
Tags: cctvMurder

ताज्या बातम्या