Home /News /national /

सब इन्स्पेक्टरच्या कारनं महिलेला चिरडलं, अंगावर शहारे आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

सब इन्स्पेक्टरच्या कारनं महिलेला चिरडलं, अंगावर शहारे आणणारा अपघाताचा LIVE VIDEO

या प्रकरणी सब-इन्स्पेक्टर आरोपी आहे. घटनेच्या वेळी नशेत असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.

    नवी दिल्ली, 04 जुलै: राजधानी दिल्लीत अनलॉक 2 च्या टप्प्यात अंगावर काटा आणणारा अपघात समोर आला आहे. या अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरधाव कारनं चालत जाणाऱ्या महिलेला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कारच्या धडकेत महिला काही अंतरावर फेकली गेली. ही घटना 3 जुलै रोजी चिल्ला गावाजवळ घडल्याची माहिती मिळत आहे देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र टप्प्या टप्प्यानं हा लॉकडाऊन उठवण्यात येत आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारनं महिलेला चिरडल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हे वाचा-VIDEO : मास्क न घालण्यावरून झाला वाद, भाजप नेत्यानं पोलिसांना केली मारहाण या व्हिडीओमध्ये आपण पाहून शकता चिंचोळ्या रस्त्यावर मागून येणाऱ्या कारनं रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला जोरात धडक दिली. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकानं स्पीड वाढवून महिलेच्या अंगावरून गाडी पुढे नेत फरार झाला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला असून धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी सब-इन्स्पेक्टर आरोपी आहे. घटनेच्या वेळी नशेत असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Accident cctv, Car accident cctv, Delhi news

    पुढील बातम्या