नवी दिल्ली, 24 जून : इंटरनेट हे असं माध्यम आहे, जिथं फक्त आपल्याला हवी असलेली माहिती तर मिळतेच पण आपल्याला बरंच काही शिकताही येत. मग ती रेसिपी असो, एक्सरसाईझ असो किंवा आणखी काही. याचे व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध असतात. तुमच्यापैकी बरेच लोक असेच ऑनलाईन व्हिडीओ पाहूनही काही ना काही शिकलं असेल. पण काहीही शिकण्याची ही पद्धत जितकी सोपी आहे, तितकीच ती खतरनाकही आहे. असं ऑनलाईन प्रशिक्षण काही वेळा जीवावरही बेतू शकतं. असंच नवी दिल्लीलीतल एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे
(9 Year old boy dies while doing skipping rope).
इंटरनेटवर व्हिडीओ पाहून दोरीउड्या शिकणाऱ्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. हार्दिक असं या चिमुकल्याचं नाव आहे. 9 वर्षांचा हार्दिक पाचवी इयत्तेत होता. तो मूळचा मध्य प्रदेशचा होता. दिल्लीतील न्यू उस्मानपूरमधील करतार नगर परिसरात तो राहत होता.
हार्दिक युट्यूबवर दोरीउड्यांचे व्हिडीओ पाहत होता. युट्यूबवर दोरीउड्या पाहून तोसुद्धा दोरीउड्या मारायला शिकत होता. त्याच वेळी त्याच्या मानेत दोरी अडकली आणि श्वास कोंडल्याने त्याचा जीव गेला.
हे वाचा - VIDEO - नवरदेवाचा अतिउत्साह बेतला मित्राच्या जीवावर; लग्नाच्या वरातीत जवानाचा मृत्यू
आज तकच्या रिपोर्टनुसार हार्दिक दोरीउड्या मारत असताना तिथं जवळच एका भिंतीला एक खाट टेकवून ठेवली होती. हार्दिक दोरीउड्या मारत असताना त्याच्या दोरीचं एक टोक खाट आणि दुसरं टोक मुलाच्या गळ्यात अडकलं. गळफास लागावा तसा तो खाटीला लटकला, त्याचा श्वास गुदमरला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.