दिल्ली जवळच्या नोऐडातल्या झोपडपट्टीत 200 जण कोरोना संशयित, सर्वांना केलं क्वारंटाइन

दिल्ली जवळच्या नोऐडातल्या झोपडपट्टीत 200 जण कोरोना संशयित, सर्वांना केलं क्वारंटाइन

देशात गेल्या 24 तासांमध्ये 508 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झालाय.

  • Share this:

नोएडा 07 एप्रिल : राजधानी दिल्लीजवळच्या नोएडामध्ये एका झोपडपट्टीत 3 जणांना कोरोनाची लागण झाली झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 200 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दिल्ली जवळचं हे सर्वात मोठं प्रकरण समजलं जातं. नोएडातल्या सेक्टर 8मधल्या झोपडपट्टीत हे सर्व लोक राहतात. माणसांची गर्दी, दाटीवाटीने असलेल्या झोपड्या त्यामुळे लागण होण्याची शक्यता जास्त असते. या सगळ्या लोकांना क्वारंटाइन केल्यानंतर आता सर्व परिसर सॅनिटाईज केला जात आहे.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 508 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झालाय. तर पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 4,789वर गेली आहे. तर 353 जण बरे झाले आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 124 वर गेली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यानं हे थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका अभ्यासानुसार देशातील 30 टक्के कोरोनाचे रुग्ण हे 10 जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे. यातील दोन तर महाराष्ट्रातच आहेत.

दिल्लीहून आलेले 60 तबलिगी 'आउट ऑफ रेंज'; महाराष्ट्राचा धोका वाढला

देशातमध्ये राज्यांची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र, दिल्ली, केरळ या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढणाऱ्या राज्यांत दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीत आतापर्यंतचं प्रमाण 31.7 टक्के तर आंध्र प्रदेशचं प्रमाण 20 टक्के आहेत. त्याखालोखाल 11.9 टक्के राजस्थान तर तेलंगणात 12 टक्के आहे. हेच महाराष्ट्रात 4.4 टक्के इतकं आहे. दिल्लीत तबलीगी जमात प्रकरणानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली.

देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याखालोखाल तामिळनाडु आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. याशिवाय देशातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यावरून देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के रुग्ण हे 10 जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे. त्या दहामध्ये महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे वाचा : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 पार; मुंबईच्या हॉटस्पॉटमध्ये कहर, 5 मृत्यू

सर्वाधिक रुग्णांची संख्या साउथ दिल्लीत आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईत कोरोनाचे रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर केरळमधील कसारगोड हा जिल्हा आहे. चौथ्या क्रमांकावर हैदराबाद असून पाचव्या क्रमांकावर मध्य प्रदेशातील इंदौर आहे. सर्वाधिक रुग्णांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असेललं राज्य तामिळनाडुच्या चेन्नईचाही दहा जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पुण्याचा समावेश आहे. महाराष्ट्रात आधी पुण्यातच कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर कर्नाटकातील बेंगळुरू आणि उत्तर प्रदेशातील जीबी नगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. दहाव्या क्रमांकावर राजस्थानमधील जयपूर आहे.

 

First published: April 7, 2020, 11:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading