कॅबिनेट मंत्र्याच्या पत्नीला कोरोना, मंत्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिल्याने मंत्रिमंडळच क्वारंटाइन?

कॅबिनेट मंत्र्याच्या पत्नीला कोरोना, मंत्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिल्याने मंत्रिमंडळच क्वारंटाइन?

या घटनेमुळे पूर्ण मंत्रिमंडळालाच क्वारंटाइन करण्याबाबतही विचार केला जात असून सगळ्यांंची टेस्टही केली जाणार आहे.

  • Share this:

डेहराडून 31 मे: उत्तराखंडच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्नीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. हे मंत्री मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीतही उपस्थित होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंत्री राहात असलेला सरकारी बंगला सील करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेले आणि खुद्द मंत्री महोदय यांचीही आता कोरोना टेस्ट केली जाणार आहे.  या मंत्र्यांच्या संपर्कात कोण कोण आलं होतं त्याचं ट्रेसिंग केलं जात असून त्या सगळ्यांना क्वारंटाइन केलं जाणार आहे.

या घटनेमुळे पूर्ण मंत्रिमंडळालाच क्वारंटाइन करण्याबाबतही विचार केला जात असून सगळ्यांंची टेस्टही केली जाणार आहे. या मंत्र्यांच्या पत्नी या दिल्लीहून परतल्या होत्या. त्यांच्या संपर्कातल्या लोकांचीही माहिती काढली जात आहे. सगळा परिसर सॅनिटाईज केला जात आहे. 20 तारखेलाच मंत्री हे नवीन बंगल्यात राहायला आले होते. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे 749 रुग्ण आहेत.

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे जून महिन्यातही कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी नवी गाईडलाईन जाहीर केली आहे.

हेही वाचा.. मजुरांसाठी धावणाऱ्या सोनू सूदचं राज्यपालांनी केलं कौतुक, म्हणाले...

ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असणार आहे. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, जिम, आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद राहणार आहे. दुकानांमध्ये केवळ 5 लोक एकावेळी खरेदी करु शकतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोक उपस्थित राहू शकतात, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. यासाठी पासची आवश्यकता नसणार आहे.

एअर इंडियाचा पायलट निघाला कोरोना पॉझेटिव्ह, अर्ध्यातून बोलावलं विमान

8 जूननंतर कंन्टेमेट झोनशिवाय इतर ठिकाणी सर्व मंदिर, मॉल, शॉप्स खुले होतील. राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती विचार लक्षात घेत शाळा कॉलेज याचा विचार करावा अथवा पुन्हा जून अखेर आढावा घेऊन जुलै महिन्यात सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

First published: May 31, 2020, 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading