आता महाराष्ट्रातही होऊ शकते सफरचंदाची शेती, उष्ण वातावरणात येतं HRMN 99

आता महाराष्ट्रातही होऊ शकते सफरचंदाची शेती, उष्ण वातावरणात येतं HRMN 99

50 डिग्री सेल्सीयसपर्यंतच्या तापमानात हे झाडं जगू शकते. हिमालच आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारची सफरचंद मिळतात त्याच दर्जाची ही सफरचंद आहेत

  • Share this:

डेहराडून 14 जुलै: सफरचंद (Apple) म्हटलं की आपल्याला आठवते ते काश्मीर (Kashmir) आणि हिमाचल प्रदेश. (Himachal Pradesh) थंड प्रदेशात येणारं फळ म्हणूनच त्याकडे पाहिलं जातं. मात्र आता सफरचंदाची शेती महाराष्ट्रातल्या उष्ण वातावरणातही करता येऊ शकते असा दावा डॉक्टर केसी शर्मा यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत मोठ्या पदांवर काम केलेले शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून सफरचंदाच्या या वाणाचा प्रचार करत आहे. HRMN 99 असं त्या वाणाचं नाव असून काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत हे वाण लागू शकतं असा त्यांचा दावा आहे.

हिमाचल प्रदेशमधल्या बिलासपूर इथले शेतकरी हरिमन शर्मा यांनी सफरचंदाच्या या वाणाचा शोध लावला. त्यांच्या नावावरूनच त्याला HRMN 99 हे नाव देण्यात आलं आहे. त्याच वाणाचा डॉ. शर्मा 1999 पासून या वाणाचा प्रचार-प्रसार करत आहेत.

50 डिग्री सेल्सीयसपर्यंतच्या तापमानात हे झाडं जगू शकते. त्यामुळेच विदर्भातल्या नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि मुंबई  पासून ते राजस्थान आणि दिल्लीतल्या वातावरणातही हे झाडं जगू शकते असा त्यांचा दाव आहे.

हिमालच आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारची सफरचंद मिळतात त्याच दर्जाची ही सफरचंद आहेत आणि त्यात जीवनसत्वही त्याच दर्जाची असल्याचं आढळून आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

बापरे! महापुरामुळे वाघाने रात्रभर ठोकला शेळ्यांच्या गोठ्यात मुक्काम

दिल्लीत राष्ट्रपती भवनातही हे झाडं लावण्यात आलं आहे. एका झाडाला 1 ते दीड क्विंटलपर्यंत सरफरचंद लागू शकतात असा दावाही त्यांनी केला आहे. या जातीच्या वाणीची आता नर्सरी तयार करण्याचाही त्यांचा विचार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 15, 2020, 12:02 AM IST
Tags: apple

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading