17 जुलै : देहरादूनमध्ये 9 ते 14 वर्षांच्या 5 मुलांनी 8 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केला आहे. हा बलात्कार करण्याआधी 2 दिवसांपूर्वी या पाचही मुलांनी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता. त्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे. या पाचही मुलांना सध्या बालसुधार गृहात ठेवण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरुवारी देहरादूनच्या सहसपुर परिसरात हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी पोलिसांकडे यांसदर्भात तक्रार नोंदवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या पाचही मुलांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांना सध्या बालसुधार गृहात ठेवण्यात आलं आहे.
सहसपुर पोलीस स्टेशनचे प्रमुख नरेश राठोड यांच्या सांगण्यानुसार, या मुलांनी दोन दिवसांआधी पॉर्न व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर त्यांनी या बलात्काराच संपूर्ण कट रचला. कोणत्या वेळी आणि कोणत्या वेळी मुली एकट्या असतात, त्याचबरोबर आपण कोणत्या मुलीला फसवू शकतो याबद्दल या सगळ्या मुलांना माहित होतं.
ज्यादिवशी ही घटना घडली त्यावेळी 8 वर्षांची चिमुकली त्यांच्यासमोर खेळत होती. त्यानंतर त्यांनी तिला फसवून घरात नेलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
राठोड यांनी सांगितल्यानुसार, रविवारी पोलिसांनी या पाच जणांना अटक केलं. पॉक्सो अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना जुवेनाइल कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना आता बालसुधार गृहात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान पीडित मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
हेही वाचा...
VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन
आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा