संरक्षण मंत्र्यांचा चीनला इशारा; रुग्णालय असो वा बॉर्डर आम्ही कायम तयारीतच

संरक्षण मंत्र्यांचा चीनला इशारा; रुग्णालय असो वा बॉर्डर आम्ही कायम तयारीतच

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक आघाडीसाठी तयार असल्याचा विश्वास राजनाथ सिंहानी व्यक्त केला

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जुलै : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला थेट इशारा दिला आहे. कोविड सेंटरचे निरीक्षण करण्यासाठी दिल्ली येथे पोहोचलेले संरक्षणमंत्री म्हणाले की, भारत प्रत्येक आघाडीवर सज्ज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे कोविड - 19 रूग्णांच्या उपचारांसाठी बनवलेल्या 1,००० खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले होते.

त्याचवेळी चीनविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “आम्ही प्रत्येक आघाडीसाठी तयार आहोत, ती सीमा असो की रुग्णालय, आम्ही कधीच तयारीत मागे पडत नाही.”

हे रुग्णालय केवळ 11 दिवसात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ संरक्षण मंत्रालयाच्या जमिनीवर बांधले गेले आहे. या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये 250 बेड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे रुग्णालय सशस्त्र दलातील कर्मचारी चालवतील.

चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता हवाई दल आणि सैन्य एकत्रितपणे चीनवर लक्ष ठेवून आहेत. गलवान खोऱ्यात भारताने चीनच्या तुलनेत मोठं सैन्य तैनात केले आहे.

त्याच वेळी, अमित शहा यांनी ट्विट केले की, 'डीआरडीओ आणि टाटा सन्स यांनी विक्रमी वेळेत केलेल्या संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह जी यांच्यासमवेत 250 आयसीयू बेड्ससह 1000 बेडच्या रूग्णालयाला भेट दिली.'

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: July 5, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या