संरक्षणमंत्र्यांनी 'तेजस'मधून उड्डाण करून रचला इतिहास, पाक-चीनही या लढाऊ विमानाला घाबरतं

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (19 सप्टेंबर) सकाळी स्वदेशी लढाऊ विमान 'तेजस'मधून(Tejas Fighter Aircraft)उड्डाण भरून इतिहास रचला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 12:20 PM IST

संरक्षणमंत्र्यांनी 'तेजस'मधून उड्डाण करून रचला इतिहास, पाक-चीनही या लढाऊ विमानाला घाबरतं

बंगळुरू,19 सप्टेंबर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (19 सप्टेंबर) सकाळी स्वदेशी लढाऊ विमान 'तेजस'मधून(Tejas Fighter Aircraft)उड्डाण भरून इतिहास रचला आहे. स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजसमध्ये बसून उड्डाण भरणारे राजनाथ सिंह हे पहिलेच संरक्षणमंत्री ठरले आहेत. तीन वर्षांपूर्वी 'तेजस' वायुदलाच्या सेवेत दाखल झालं होतं. लवकरच अद्ययावत स्वरूपातलं 'तेजस' विमानांचा वायुदलात समावेश होणार आहे. संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तेजस' वायुदलाच्या 45व्या स्क्वॉडइन 'फ्लाइंग ड्रॅगर्स'चा भाग आहे. हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या भारतीय कंपनीने तेजसची निर्मिती केली आहे. 4 जानेवारी 2001मध्ये पहिल्यांदा तेजसनं उड्डाण भरलं होतं.  वायुदलानं डिसेंबर 2017मध्ये हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)कंपनीला 83 अद्ययावत तेजस विमानांची निर्मिती करण्याची जबाबदारी सोपवली होती. यासाठी 50 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे.

(वाचा : पाकच्या बॅट कमांडोंचा घुसखोरीचा कट भारतीय लष्कराने उधळला, पाहा VIDEO)

Loading...

चीन आणि पाकिस्तानही घाबरतात 'तेजस'ला  

तेजस हे भारतीय बनावटीचं डिझाईन आहे. पाकिस्तान आणि चीननं संयुक्तरित्या निर्मिती केलेल्या थंडरबर्डपेक्षाही कित्येक पटीनं तेजस शक्तीशाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा-जेव्हा 'तेजस'च्या प्रात्यक्षिकांसंदर्भात बातचित केली गेली आहे, त्या-त्या वेळेस पाकिस्तान आणि चीननं आपलं थंडरबर्ड मागे घेतलेलं आहे.

(वाचा : मोठी बातमी! काश्मीर मुद्यावरून आता चीनकडूनही पाकिस्तानला दणका)

अटल बिहारी वाजयेपी यांनी दिलं होतं 'तेजस' नाव  

हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडनं निर्मिती केलेल्या या विमानाचं 'तेजस' हे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलं होतं. संस्कृत शब्दापासून हे नाव ठेवण्यात आलं आहे.

(वाचा :लवकरच पाक व्याप्त काश्मीर भारताचा भौगोलिक भाग असेल; मंत्र्यांचे मोठं वक्तव्य!)

स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2019 11:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...