S M L

शहिदांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करा, संरक्षणमंत्र्यांचं पत्र

गेल्या वर्षी जवानांच्या मुलांचं शैक्षणिक शुल्क निश्चित केल्यानंतर सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये असंतोष पसरला होता.

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2018 11:13 PM IST

शहिदांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करा, संरक्षणमंत्र्यांचं पत्र

10 फेब्रुवारी : शहीद जवानांच्या मुलांची शैक्षणिक फी पुन्हा एकदा सरकारकडून माफ केली जाऊ शकते. यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन  यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलंय.

गेल्या वर्षी जवानांच्या मुलांचं शैक्षणिक शुल्क निश्चित केल्यानंतर सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये असंतोष पसरला होता. शहिदांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्काच्या रुपात दिली जाणारी रक्कम १० हजार रुपये निश्चित झाल्यानंतर याला विरोध करण्यात येत होता. युद्धात हौतात्म्य किंवा अपंगत्व आलेल्या जवानांच्या मुलांना शिक्षणात मदत म्हणून १० हजार रुपयेच दिले जावेत, असं यापूर्वी सरकारनं सांगितलं होतं.

गेल्या अधिवेशनात राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले होते की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच शिक्षण सहकार्याची मर्यादा ठरवली गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 11:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close