S M L

पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन परतल्या नौदलाच्या 6 रणरागिणी, संरक्षण मंत्र्यांनी केलं स्वागत

नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांनी 7 महिन्यांत 'INS तारिणी' या शिडाच्या बोटीतून खडतर प्रवास करत पृथ्वी प्रदक्षिणा पुर्ण केली. आणि अखेर आज नौदलाच्या या 6 महिला दर्यावर्दी खलाश्यांचं संध्याकाळी 4 वाजता गोव्यातील पणजी बंदरात आगमन झालं.

Renuka Dhaybar | Updated On: May 21, 2018 07:38 PM IST

पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन परतल्या नौदलाच्या 6 रणरागिणी, संरक्षण मंत्र्यांनी केलं स्वागत

गोवा, 21 मे : ही बातमी सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी आहे. कारण आज भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक दिवस आहे. नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांनी 7 महिन्यांत 'INS तारिणी' या शिडाच्या बोटीतून खडतर प्रवास करत पृथ्वी प्रदक्षिणा पुर्ण केली. आणि अखेर आज नौदलाच्या या 6 महिला दर्यावर्दी खलाश्यांचं संध्याकाळी 4 वाजता गोव्यातील पणजी बंदरात आगमन झालं.

त्यांच्या स्वागतासाठी नौदलानं जंगी तयारी केली होती. नौदलाच्या या 6 धाडसी महिला दर्यावर्दीचं स्वागत खुद्द संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. दरम्यान त्यांनी बंदरावर पोहोचताच मोठा जल्लोष साजरा केला.

या आधी भारतीय नौदलातील कमांडर दिलीप दौंदे आणि कॅप्टन अभिलाष टॉमी यांनी आयएनएस म्हादेई या शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा पुर्ण केली होती. आता भारतीय नौदलातील महिलांनीही त्यांची 'नारी शक्ती' जगाला दाखवून दिली आहे.

 

Loading...
Loading...

या आहेत त्या धाडसी महिला नौदल अधिकारी

१) कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी

२) लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती

३) लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल

४) लेफ्टनंट विजया देवी

५) लेफ्टनंट पी. ऐश्वर्या

६) लेफ्टनंट पायल गुप्ता

INSV तारिणीचा प्रवास

- गोवा पणजी बंदरातून 5 सप्टेंबर 2017 पासून प्रवासाला सुरूवात

- 37 दिवसानंतर पहिला टप्पा ऑस्ट्रेलियातील फ्रीमँटल बंदर

- 59 दिवसांनंतर दुसरा टप्पा न्यूझीलँड लॅटेंल्टन बंदर

- 94 दिवसांनी तिसरा टप्पा फॉकलँड बंदर

- 122 दिवसांनी चौथा टप्पा दक्षिण आफ्रिका केप टाऊन बंदर

- 164 दिवसांनी गोवा पणजी बंदरात परत

- तब्बल 164 दिवसांनी म्हणजेच 7 महिन्यांनी आज मायदेशी परतणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 07:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close