चेन्नई, 29 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या महिनाभरात घडलेल्या घडामोडीमुळे संपूर्ण देशाला त्या देशाबद्दलचं धोरण नव्यानं ठरवण्याची गरज आली आहे. काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेनंही अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला करत आक्रमक धोरण जाहीर केलं, आहे. या विषयावर भारतानं आजवर सावध भूमिका घेतली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या विषयावर सरकारची भूमिका मांडली आहे.
'अफगाणिस्तानमधील परिस्थिती आव्हानात्मक आहे. भारत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीनं अनेक देशांना रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडलं आहे. भारत देखील याबाबत गरज पडली तर रणनीतीमध्ये बदल करेल. भारत अफगाणिस्तानबाबत नव्यानं विचार करत असून गरज पडल्यास नवी रणनीती तयार करेल.' असे सिंह यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूतील वेलिंग्टनमध्ये डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संरक्षण मंत्रालयाकडून इंटिग्रेटेड बॅटस ग्रुप तयार करण्याबाबत विचार सुरु आहे. हा ग्रुप आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर महत्त्वाचे निर्णय घेईल. असे सिंह यांनी स्पष्ट केले.
The changing equation in #Afghanistan is a challenge for us... These situations have forced our country to rethink its strategy. We are changing our strategy and the formation of QUAD underlines this strategy: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/KNHHCXhMNZ
— ANI (@ANI) August 29, 2021
पाकिस्तान गप्प आहे कारण..
राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानवरही जोरदार टीका केली. ' दोन युद्धात झालेल्या पराभवानंतर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग स्वीकारला आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना शस्त्र आणि प्रशिक्षण दिले जाते. मात्र मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की आता भारत बदलला आहे. आता भारत आपल्या भूभागाचा वापर दहशतवाद्यांना करु देणार नाही. त्याचबरोबर त्यांचा बंदोबस्त देखील करेल. भारतानं आता बचावात्मक धोरण सोडून उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलं असल्याची पाकिस्तानला कल्पना आहे, त्यामुळेच पाकिस्तान गप्प आहे,' असे सिंह यांनी यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Rajnath singh, Taliban