08 आॅक्टोबर : भारत आणि चीनचं वैर जुनं. पण प्रत्येक वेळा ते वैर दिसलंच पाहिजे, किंवा त्याप्रमाणेच वागलं पाहिजे, असं नाही. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी याचंच दर्शन काल घडवलं.
सिक्किमच्या नथु ला पासला त्या गेल्या होत्या. तिथे सीमेवर जाऊन त्यांनी पाहणी केली. बघतात तर काय, चीनच्या हद्दीत अनेक सैनिक आणि छायाचित्रकार उत्सुकतेन बघत होते. सीतारमण यांनी शांतपणे, चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून त्यांना हात दाखवला.
आपले लष्करी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही प्रसन्न भाव होते. चीनच्या छायाचित्रकारांनी या क्षणाचे भरपूर फोटो टिपले. पीटीआयनं हा फोटो प्रसिद्ध केलाय.
Acknowledged a row of Chinese soldiers from across the fence who were taking pictures on my reaching Nathu La. @DefenceMinIndia pic.twitter.com/7cWImtmfLG
Loading...— Nirmala Sitharaman (@nsitharaman) October 7, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा