संरक्षणमंत्री निर्मला सितारमन 'टायगर'च्या भेटीला

संरक्षणमंत्री निर्मला सितारमन 'टायगर'च्या भेटीला

केवळ देशातच नाही तर परदेशातही अभिनंदन यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची तब्बल तीन दिवसांनंतर पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली. शुक्रवारी(1 मार्च)रात्री अभिनंदन मायदेशी सुखरूप परतले. या ढाण्या वाघाच्या भारतवापसीचा आणि सुखरूप सुटकेचा देशभरात जल्लोष सुरू आहे. शिवाय, केवळ देशातच नाही तर परदेशातही अभिनंदन यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर, अभिनंदन यांची विचारपूस करण्यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी शनिवारी (2 मार्च)हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

याच पार्श्वभूमीवर, अभिनंदन यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी शनिवारी (2 मार्च)हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान संरक्षणमंत्री सितारमन यांच्यासोबत वायुदलाचे काही अधिकारीदेखील हजर होते.दरम्यान, शुक्रवारी(1मार्च)अभिनंदन यांची भारतवापसी झाल्यानंतर संरक्षणमंत्री सितारमन यांनी ट्विटदेखील केले होते.

"अभिनंदन वर्तमान आम्हाला तुमचा अभिमान आहे. संपूर्ण देश तुमच्या धाडसाचे आणि कृतज्ञतेचे कौतुक करत आहे. आपल्या भावीपिढीसाठी तुम्ही प्रेरणादायी आहात. वंदे मातरम्!'',अशा शब्दांत सितारमन यांनी अभिनंदन यांचे कौतुक केले.


ढाण्या वाघाची भारतवापसी

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान शुक्रवारी (2 मार्च) देशात परतले. शुक्रवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास अभिनंदन यांनी पाकिस्तानची हद्द पार करत भारतात प्रवेश केला. यापूर्वी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांच्या भारतवापसीमध्ये दिरंगाई केली होती.

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले. अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.

बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (2 मार्च)भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

नेमकी काय आहे घटना?

- पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.

- पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.

- पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.

- त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.

- पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.

- पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले.

- संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.

- नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली

- आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान यांना सोडाव लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या