पंतप्रधान मोदींनी सुरु केली #BharatKiLaxmi मोहिम, पीव्ही सिंधु आणि दीपिका ब्रँड अॅम्बेसिडर

भारत की लक्ष्मी या मोहिमेसाठी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधु आणि दीपिका पदुकोण यांना ब्रँड अॅम्बेसिडर करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 09:22 AM IST

पंतप्रधान मोदींनी सुरु केली #BharatKiLaxmi मोहिम, पीव्ही सिंधु आणि दीपिका ब्रँड अॅम्बेसिडर

मुंबई, 23 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या भारत की लक्ष्मी या मोहिमेसाठी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधु आणि दीपिका पदुकोण यांना ब्रँड अॅम्बेसिडर करण्यात आलं आहे. देशातील महिलांकडून केलं जाणारं चांगलं काम लोकांसमोर आणण्यासाठी ही मोहिम सुरू कऱण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर याची सुरुवात होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावर नव्या मोहिमेचा व्हिडिओ शेअर केला आहे. मोदींनी म्हटलं की, भारतातील महिला शक्ती, प्रतिभा, प्रतिज्ञा आणि निष्ठा यांचे प्रतिक आहेत. आपल्या संस्कृतीने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं आहे.

भारत की लक्ष्मी सेलिब्रेट करण्यासाठी पीव्ही सिंधू आणि दीपिका पदुकोन यांनीही संदेश दिला आहे. दीपिकाने हा व्हिडिओ शेअऱ करताना म्हटलं की, आपण सर्व मिळून देशातील महिलांचे योगदान आणि यश साजरं करूया!

पीव्ही सिंधू म्हणाली की, ज्यावेळी महिला सक्षम असतात तेव्हा त्याच्या यशाकडे गर्वाने पाहिलं जातं आणि समाज पुढं जातो. मोदींनी सुरू केलेल्या #BharatKiLaxmi या मोहिमेचं समर्थन करत आहे. ही मोहिम भारतातील असामान्य महिलांचे असामान्य यश साजरं करत आहे.

Loading...

भारत की लक्ष्मी मोहिमेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्या आव्हानांचा सामनवा करावा लागतो हे दाखवलं आहे. तसेच तुमच्याही पाहण्यात महिलांची प्रेरणादायी गोष्ट असेल तर ती शेअर करा असं आवाहनही करण्यात आलं आहे.

SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Deepika
First Published: Oct 23, 2019 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...