दीपिका कक्कड ठरली 'बिग बॉस 12'ची विजेती!

दीपिका कक्कड ठरली 'बिग बॉस 12'ची विजेती!

बिग बॉसमध्ये माजी क्रिकेटपटू श्रीशांत दुसऱ्या स्थानावर राहिला.

  • Share this:

मुंबई 30 डिसेंबर : सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कलर्स वाहिनीवरच्या 'बिग बॉस 12'च्या विजेत्याची अखेर घोषणा झालीय. दीपिका कक्कड इब्राहिम बिग बॉसची विजेता ठरली. 30 डिसेंबरच्या रात्री झालेल्या एका रंगारंग कार्यक्रमात बिग बॉस सलमान खानने दीपिकाच्या नावाची घोषणा केली.

रविवारी झालेल्या खास कार्यक्रमात जेव्हा शेवटचा क्षण आला  तेव्हा सर्वांची उत्कंठा शिगेल पोहोचली होती. आपल्या खास स्टाईलने सलमान खानने त्यात आणखी उत्सुकता निर्माण केली. श्रीशांत की दीपिका असा खेळ सलमानने बराच वेळ केला आणि शेवटी दीपिकाच्या नावाची घोषणा त्याने केली आणि बिग बॉसचा 12वा सिझन संपला.

कलर्स वाहिनीच्या ससुराल सिमर का या मालिकेत दीपिका सूनेच्या भूमिकेत होती. दीपिकाची ती भूमिका चांगलीच गाजली होती. वाद, भांडणं, तंटे, नाट्य अशा अनेक गोष्टींनी बीग बॉस कायम चर्चेत होतं. त्यामुळं साहाजिकच याचा विजेता कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती.

माजी क्रिकेटपटू श्रीशांत दुसऱ्या स्थानावर राहिला. तर बिहारच्या दीपक ठाकूरने 25 लाखांचा चेक घेऊन फायनलच्या रेसमधून स्वत:ला दूर केलं होतं.

First published: December 31, 2018, 12:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading