स्मृती इराणी ग्रॅज्युएट नाहीत ! 'फर्जी डिग्री की चोरनी', काँग्रेस आमदाराची टीका

अमेठी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपले शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. स्मृती इराणी या 'ग्रॅज्युएट' नसल्याचे समोर आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 12:05 PM IST

स्मृती इराणी ग्रॅज्युएट नाहीत ! 'फर्जी डिग्री की चोरनी', काँग्रेस आमदाराची टीका

नवी दिल्ली, 12 एप्रिल-  अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी गुरुवारी(11 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपले शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. स्मृती इराणी या 'ग्रॅज्युएट' नसल्याचे समोर आले आहे. यावर काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी इराणींवर जोरदार टीका केला आहे. 'फर्जी डिग्री की चोरनी।  क्यों चौकीदार अपनी डिग्री छुपा रही हैं।', असे ट्विट दीपक सिंह यांनी केले आहे.

2014 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवताना स्मृती इराणी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून 1994 मध्ये बीएपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती दिली होती. मात्र, आता त्यांनी आपण 3 वर्षांचा कोर्स पूर्ण न केल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे.



स्मृती इराणींच्या संपत्तीत वाढ

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात स्मृती यांनी  4.71 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित केली आहे. 2014 लोकसभा  निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांची मालमत्ता 26.98 लाख रुपये इतकी होती. स्मृती इराणी या अमेठी मतदार संघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी 3 लाख मतं मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी यांनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.

क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी - काँग्रेस



राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...