कलम 370 चा निर्णय आज, सर्वोच्च न्यायालयात 8 याचिकांवर होणार सुनावणी

कलम 370 चा निर्णय आज, सर्वोच्च न्यायालयात 8 याचिकांवर होणार सुनावणी

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह या 8 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्याला आव्हान देणाऱ्या 8 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिकांवर सुनावणी होणार आहे त्यात राज्यातून कलम 370 हटवल्याबद्दल, राष्ट्रपती राजवटीची वैधता आणि तिथं लादण्यात आलेली बंधनं यांचा समावेश आहे. या याचिकांमध्ये एक याचिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचीसुद्धा आहे.

काश्मीर संदर्भातील या सर्व याचिकांची सुनावणी सरन्यायाधिश रंजन गोगोई आणि न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि अब्दुल नजीर यांचे पीठ करणार आहे. जम्मू आणि काश्मीर पीपल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख सज्जाद लोन यांनीही सर्वोच्च न्यायालयात धावा घेतली होती. त्यांनी राज्यातील कलम 370 हटवण्याला आव्हान दिलं होतं. याशिवाय बालहक्क कार्यकर्ती इनाक्षी गांगुली आणि प्राध्यापक शांता सिन्हा यांनी कलम 370 हटवल्यानंतर मुलांना घरांमध्ये कैद केल्याबद्दल याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालय सोमवारी राज्यसभा सदस्य आणि एमजीएमकेचे संस्थापक वायको यांच्या याचिकेवरसुद्धा सुनावणी करणार आहे. या याचिकेत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. फारुख अब्दुल्ला कलम 370 हटवल्यानंतर नजरकैदेत आहेत. काश्मीर टाइम्सच्या संपादक अनुराधा भसीन यांनीही याचिका दाखल केली आहे. त्यांनी काश्मीरमध्ये माध्यमांवर घातलेली बंदी हटवण्याची मागणी केली आहे.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. याचिकेत आझाद यांनी त्यांच्या घरच्या राज्यात जाण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. ज्या राज्यात नातेवाईक आणि कुटुंबीय राहते तिथं जाता यावं, त्यांना भेटता यावं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काश्मीर दौरा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना प्रशासनाने विमानतळावरून परत पाठवलं होतं.

VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'

Published by: Suraj Yadav
First published: September 16, 2019, 9:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading