मराठी बातम्या /बातम्या /देश /

कर्जबुडव्या विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं, याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर

कर्जबुडव्या विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं, याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर

मद्य व्यावसायिक (Liquor Businessman) विजय माल्याला (Vijay Mallya) ब्रिटनमधील एका न्यायालयानं (UK Court) सोमवारी दिवाळखोर घोषित केलं (declared bankrupt) आहे.

मद्य व्यावसायिक (Liquor Businessman) विजय माल्याला (Vijay Mallya) ब्रिटनमधील एका न्यायालयानं (UK Court) सोमवारी दिवाळखोर घोषित केलं (declared bankrupt) आहे.

मद्य व्यावसायिक (Liquor Businessman) विजय माल्याला (Vijay Mallya) ब्रिटनमधील एका न्यायालयानं (UK Court) सोमवारी दिवाळखोर घोषित केलं (declared bankrupt) आहे.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 28 जुलै: मद्य व्यावसायिक (Liquor Businessman) विजय माल्याला (Vijay Mallya) ब्रिटनमधील एका न्यायालयानं (UK Court) सोमवारी दिवाळखोर घोषित केलं (declared bankrupt) आहे. त्यामुळे विजय माल्याच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत, ब्रिटनमधील न्यायालयानं विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं आहे. त्यामुळे आता माल्याच्या जगभरातील संपत्तीवर जप्ती आणणं सोपं होणार आहे. यातून भारतीय बँकांचा पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

पुढे काय होणार?

ब्रिटनच्या कायद्यानुसार, विजय माल्ल्याने आता आपली सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच त्यांची उर्वरित संपत्ती दिवाळखोरी विश्वस्ताकडे (bankruptcy trustee) जमा करावी लागणार आहे. यानंतर संबंधित विश्वस्त समिती या प्रकरणाचा पुढील तपास करेल. त्यानंतर त्याच्या मालमत्तेचा आणि त्याच्याकडे असणाऱ्या कर्जाचं मुल्यांकन करण्यात येईल. यानंतर बॅड लोन म्हणून भारतीय बँकाची कर्ज भरपाई केली जाईल. यामुळे आता भारतीय बँकाचं काही प्रमाणात का होईना पण कर्ज भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजय माल्या ब्रिटनला पळून गेल्यानं मानवी हक्क्याच्या कायद्यांमुळे माल्यावर कारवाई करणं अवघड जात होतं. पण आता मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा-6 महिन्यांपूर्वी सर्वात श्रीमंताच्या यादीत असलेला तो आज अब्जाधीशही नाही कारण...

विजय माल्या याच्यावर भारतातील जवळपास 12 बँकाचं एकूण 10000 करोडहून अधिक रुपयाचं कर्ज आहे. माल्यावरील कर्जाचं प्रकरणं समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि सेबी अशा विविध संस्था माल्ल्याच्या पाठीमागे लागला. यामुळे 2016 साली विजय माल्या भारतातून ब्रिटनला पळून गेला. त्यानंतर 2017 पासून भारतीय बँका ब्रिटनमध्ये माल्याविरोधात खटला लढत आहेत. प्रत्यार्पणासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत.

हेही वाचा-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल

पण एप्रिल 2020 मध्ये, यूके उच्च न्यायालयानं प्रत्यार्पण विरोधात माल्ल्याची याचिका फेटाळून लावली होती. तेथूनच माल्याच्या अडचणींत वाढ व्हायला सुरुवात झाली होती. माल्याविरोधात भारतात फसवणूक, गुन्हेगारी षड्यंत्र, मनी लॉन्ड्रिंग आणि कर्जाची रक्कम दुसरीकडे वळवणे असे विविध आर्थिक गुन्हे दाखल आहेत.

First published:

Tags: Crime news