नवी दिल्ली, 14 मार्च : आपल्या साहसाचा आणि शौर्याचा दाखला देत पाकिस्तानचं F16 विमान पाडणारा भारतीय वायुदलाचा विंग कमांडर अभिनंदन यांचे डीब्रीफिंग म्हणजे चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारतीय वायुदलाने दिलेल्या माहितीनूसार, अभिनंदन यांची सर्व संघटना आणि वायुदलाकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता अभिनंदन ेह सुट्टीसाठी घरी जाऊ शकतात अशी माहिती वायुदलाकडून देण्यात आली आहे.
लष्कराच्या परवानगीने आणि रेफरल रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून तसा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता सुट्टीसाठी अभिनंदन घरी जाणार आहेत. सुट्टीवरून आल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांची पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतर ते परत फायटर पायलट म्हणून कामावर रुजू होतील.
IAF Sources: A medical review board in the near future will assess the medical fitness of Wing Commander #AbhinandanVarthaman and decide on when can he resume his operations as a fighter pilot. https://t.co/B4DAZR4jhY
भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांना पिटाळून लावत असताना भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचं मिग - 21 बुधवारी (27 फेब्रुवारी)क्रॅश झालं होतं. यानंतर त्यांनी पॅरेशूटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. येथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं.
गुरुवारी (28 फेब्रुवारी)पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत केली. शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले होते. पण खरंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव वाढला होता.
पाकिस्ताननं 1 मार्चला अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केलं. 1 मार्चला रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास अभिनंदन भारतात परतले. भारतात आल्यानंतर अभिनंदन यांच्या काही तपासण्या केल्या गेल्या, त्याचाच एक भाग म्हणून काही वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या आहेत.
नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं जेट F-16 लढाऊ विमानं पाडताना भारताचं मिग-21 हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. यावेळी जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते.
मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO