पाकिस्तानातल्या एका व्हिडिओनं भारतात घेतला 30 जणांचा बळी

पाकिस्तानातल्या एका व्हिडीओचं एडीटींग करून तो भारतात मुलं पळविणारी टोळी आली असल्याचं दाखवलं जातं. या व्हिडीओमुळे भारतात 30 जणांचा बळी गेला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 10:01 PM IST

पाकिस्तानातल्या एका व्हिडिओनं भारतात घेतला 30 जणांचा बळी

मुंबई,ता.9 जुलै : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होतोय. दोन मोटरसायकलस्वार एका लहान मुलाचं त्यांच्या पालकाकडून अपहरण करतात असा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे भारतात तब्बल 30 जणांची हत्या करण्यात आली आहे. मुलं चोरणारी टोळी तुमच्या भागात आली आहे. त्यामुळं सावध राहा असा संदेश टाकत अनेक फोटो या व्हिडीओसोबत व्हायरल केले जात आहेत. त्यातून अनेक राज्यांमध्ये संशयावरून लोकांनी निष्पाप लोकांचा बळी घेतला.

हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ पाकिस्तानातल्या कराचीमधला असून पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी रोशनी नावाच्या स्वयंसेवी संस्थेने हा व्हिडिओ तयार केला होता. कराचीत दरवर्षी 3 हजार मुलांचं अपहरण होतं. त्यामुळं लोकांनी सावध राहावं असा तो व्हिडीओ आहे. मात्र तो व्हिडिओ एडीट करून तो भारतात फिरवला जात आहे. या व्हिडीओत फक्त मुलाला पळविण्यात आलं एवढच दाखवलं जातं नंतर त्याला पालकाकडे परत आणून सोडलं जातं आणि सावध राहण्याचा संदेश दिला जातो. तो भाग दाखविण्यात आला नाही.

धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं मुलं चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांची हत्या करण्यात आली होती. तर औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी निष्पाप लोकांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा बळी गेला.

हेही वाचा...

निर्भयाच्या 3 आरोपींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरविचार याचिका

Loading...

 कुख्यात गुंड मुन्ना बजरंगीची जेलमध्येच गोळ्या घालून हत्या

 अवघ्या 11 दिवसांत कोर्टाने दिली 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

 मतांसाठी काय पण ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून मतांसाठी जोगवा...

VIDEO : भरपावसात महिला काँस्टेबल आॅन ड्युटी,वृद्धांना केली मदत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...