पाकिस्तानातील क्वेटामध्ये भीषण स्फोट, 16 जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील क्वेटामध्ये भीषण स्फोट, 16 जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील क्वेटा येथे भीषण स्फोट झाला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 12 एप्रिल :  पाकिस्तानातील क्वेटा येथे शुक्रवारी (12 एप्रिल) गजबजलेल्या बाजारपेठेत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बऱ्याच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाद्वारे हजारगंजी परिसरातील हजारा समुदायातील लोकांना टार्गेट करण्यात आलं आहे. 'डॉन'नं दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळावर प्रशासनाकडून बचाव आणि  मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. तसंच संपूर्ण परिसराला चहुबाजूंनी घेराव घालण्यात आला आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: 'हा उसाला लागलेला कोल्हा', सदाभाऊ खोतांची शेट्टींवर जहरी टीका

VIDEO: 'शरद पवारांनी राजू शेट्टींनी ये-ये म्हणत पिंजऱ्यात घेतलं'

VIDEO: ओमराजे निंबाळकर म्हणतात, 'तुम्हाला हक्काचं पाणी मिळवून देणार'

राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

First published: April 12, 2019, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading