श्रीनगर, 8 मार्च : गुरूवारी जम्मूमधील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मृतांचा आकडा आता वाढला आहे. या हल्ल्यामध्ये आता आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून हल्ल्यातील मृतांची संख्या दोन झाली आहे. या हल्ल्यामध्ये 29 जण जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील काहींची प्रकृती गंभीर होती. अखेर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
#UPDATE Grenade attack at Jammu bus stand yesterday: One more person succumbs to his injuries at the hospital. Death toll rises to two.
गुरूवारी जम्मूतला ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट झालं असून 'हिजबुल मुजाहीद्दीन' या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. हिजबुलचा दहशतवादी फारुख अहमद भट उर्फ ओमर याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस महासंचालक मनिष सिन्हा यांनी गुरूवारी दिली. भट हा 'हिजबुल मुजाहीद्दीन'चा कुलमर्थ जिल्ह्याचा कमांडर आहे अशी माहितीही त्यांनी दिली. घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी ही कारवाई केली.
जम्मूतील बस स्थानक परिसरात गेल्या 10 महिन्यात झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. 24 मे 2018 रोजी देखील या स्थानकाजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी आणि एक स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाला होता. यानंतर 29 डिसेंबर 2018 रोजी सुद्धा बस स्थानक परिसरात स्फोट झाला होता. सुदैवान यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या हल्ल्यनंतर ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांच्यासोबत संपर्क साधला. दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये सोबत असल्याचे यावेळेस त्यांनी डोवाल यांना सांगितले.
जम्मूतील ग्रेनेड हल्ल्याचा CCTV VIDEO समोर, लोकांनी जीव मुठीत घेऊन काढला पळ