श्रीलंका स्फोटातल्या मृतांची संख्या 207वर, एका भारतीय महिलेचा समावेश

श्रीलंका स्फोटातल्या मृतांची संख्या 207वर, एका भारतीय महिलेचा समावेश

श्रीलंकेतल्या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुठल्याही संस्थेने घेतलेली नाही. मात्र काही कट्टर संघटनांवर संशय व्यक्त करण्यात येतोय.

  • Share this:

कोलंबो, 21 एप्रिल: श्रीलंकेची राजधानी कोलंबोसह देशातील अनेक ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या मृतांची संख्या 207 वर गेल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. तर 450 जण जखमी आहेत. श्रीलंकेतल्या सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. मृतांमध्ये एका भारतीय महिलेचा समावेश असून ती केरळची राहणारी असल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या काही सातांमध्ये झालेल्या या बॉम्ब स्फओटांनी संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत लंकेत 8 बॉम्बस्फोट झाले असून त्यातले सहा आत्मघाती होते अशी माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर बंदी

कोलंबो शहरात दुपारी झालेल्या शेवटच्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहेत. दरम्यान, या स्फोटांमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समजते. संचारबंदी लागू केल्यानंतर आता सोशल मीडियावरही बंदी घालण्या आली आहे. 22 आणि 23 एप्रिलला सरकारने सुटीही जाहीर केली आहे.

इस्टर संडेच्या पवित्र दिवशीच चर्चमध्येही हे स्फोट घडविण्यात आले.  एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही करण्यात आला आहे. कोलंबोतल्या शांगरी ला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत.चर्च टार्गेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी ईस्टर संडेच्या प्रार्थनेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. बॉम्बस्फोटानंतर लोकांनी ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये सेंट अँथनी चर्चमध्ये स्फोटानंतरची दृश्ये मन विचलित करणारी आहेत. यात जमिनीवर ढिगारा पडला असून त्याखाली लोक सापडले आहेत.

हेल्प लाईन

भारतीयांसाठी परराष्ट्रमंत्रालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे. भारत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. कोलंबोतल्या भारतीय दुतावासाकडून सर्व माहिती घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांना फोन करून मदतीचं आश्वासन दिलंय. गरज पडल्यास भारत श्रीलंकेला पाहिजे ती सर्व मदत करेल असं पंतप्रधानांनी सिरीसेना यांना सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sri lanka
First Published: Apr 21, 2019 07:06 PM IST

ताज्या बातम्या