पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकी

हा ईमेल उत्तर-पूर्वेकडील राज्यातून पाठवण्यात आला असल्याची माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोंदींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांच्याकडे हा धमकीचा मेल पाठवण्यात आला. या धमकीनंतर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ईमेलमध्ये धमकी देणारं एक वाक्य लिहिण्यात आलं आहे. तसंच हा ईमेल उत्तर-पूर्वेकडील राज्यातून पाठवण्यात आला असल्याची माहिती आहे. आता दिल्ली पोलीस याबाबत अधिक तपास करत असून ही धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसनेही या सर्व प्रकारावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटलंय की, ‘या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहायला हवं. याअगोदर आपण हल्ल्यांमध्ये आपले दोन  पंतप्रधान  गमावले आहेत. तसंच छत्तीसगडमध्ये काँग्रेसने आपल्या आघाडीच्या नेतृत्वाची संपूर्ण फळीच गमावली आहे.’

याआधीही पंतप्रधानांना धमकी

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट तयार करण्यात आला होता, असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. याच आरोपात पुणे पोलिसांनी देशभर कारवाई करत पाच कथित नक्षल समर्थकांना ताब्यात घेतलं.

 

First published: October 13, 2018, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading