फाशी देण्यासाठी असते फक्त सकाळची वेळ, जल्लाद शेवटी कैद्याच्या कानात म्हणतो...!

फाशी देण्यासाठी असते फक्त सकाळची वेळ, जल्लाद शेवटी कैद्याच्या कानात म्हणतो...!

2012 मध्ये निर्भया प्रकरणातही कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना आता फाशी देण्याची वेळ जवळ आली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : 1983मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की भारतात 'रेयरेस्ट ऑफ द रेयर' सर्वात गंभीर आणि घृणास्पद प्रकरणातच फाशीची शिक्षा होईल. 2012 मध्ये निर्भया प्रकरणातही कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना आता फाशी देण्याची वेळ जवळ आली आहे. अशा स्थितीत भारतात फाशी देण्याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात. या संपूर्ण प्रक्रियेत, जेलरपासून ते फाशी देणाऱ्या जल्लादपर्यंत काय प्रक्रिया असते? फाशी देताना तो गुन्हेगारांच्या कानात काय म्हणतो?

फाशीची शिक्षा अंतिम झाल्यानंतर मृत्यूचं वॉरंट थांबवता येत आहे. दया याचिका फेटाळून लावल्यानंतर हे वॉरंट कधीही येऊ शकतं. फाशीची तारीख आणि वेळ वॉरंटमध्ये लिहिलेली असते. फाशीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यासह पुढील कार्यवाही तुरूंगातील नियमावलीनुसार केली जाते. प्रत्येक राज्यात तुरूंगात स्वतःचे मॅन्युअल असते.

एखाद्याला फाशी देताना विशिष्ट नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. त्याशिवाय फाशीची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. नियमांचे पालन केल्याशिवाय फाशीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. मृत्यूचं वॉरंट काढल्यानंतर तुला फाशी देण्यात येणार आहे, असे कैद्याला सांगितलं जातं.

इतर बातम्या - तिहार जेलमध्ये निर्भयाच्या हत्यारांना फाशी देण्यासाठी ट्रायल झालं, कारण...!

कारागृह अधीक्षक प्रशासनाला मृत्यूच्या वॉरंटची माहिती देखील देतात. जर तुरुंगात कैद्याला फाशी देण्याची व्यवस्था नसेल तर मृत्युदंडाच्या वॉरंटनंतर त्याला नवीन तुरूंगात हलविण्यात येतं.

फाशी देतानाच्या प्रसंगाविषयी बोलायचं झालं तर दरमहा बदलं जातं. परंतु सकाळी 6, 7 किंवा 8 ही वेळ कायम असते. यामागील कारण असे सांगितले जाते की, बाकीचे कैदी सकाळी झोपलेले असतात. ज्या कैद्याला फाशी द्यावी लागेल त्याला संपूर्ण दिवस थांबण्याची गरज नाही. तसेच कुटुंबालाही अंतविधी करण्यासाची संधी मिळते.

कैद्याच्या कुटुंबियांना 10-15 दिवस आधी सूचना दिली जाते. कारण ते शेवटचं कैद्याला भेटू शकतील. जेलमध्ये कैद्याची पूर्ण चेकिंग केली जाते. त्याला इतर कैद्यांपासून वेगळ्या सेलमध्ये ठेवलं जातं.

फाशीच्या दिवशी सकाळी पहारेकरी अधीक्षकांच्या देखरेखीखाली कैदीला फाशीच्या खोलीत आणतात. फाशीच्या वेळी जल्लादा व्यतिरिक्त तीन अधिकारी हजर असतात. हे तीन अधिकारी तुरूंग अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात. फाशी देण्यापूर्वी अधीक्षक दंडाधिकाऱ्यास सांगतात की, मी कैदीची ओळख करुन घेतली आहे आणि त्याचा मृत्यूदंडही वाचला आहे. मृत्यूच्या वॉरंटवर कैदीची सही असते.

BREAKING: आज पहाटे ठाणे हादरलं, कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

इतकंच नाही तर फाशी देण्याआधी कैद्याला अंघोळ घातली जाते आणि नवीन कपडेही घातले जातात. त्यानंतर त्याला फाशीच्या दोरखंडाला लटकवलं जातं. फाशी देण्याआधी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. त्यामध्ये तो कुटुंबियांना शेवटचं भेटण्याची, चांगलं जेवण खाण्याची अशा इच्छा असतात.

ज्या कैद्याला फाशी दिली जाते तेव्हा त्याच्या शेवटच्या वेळी जल्लाद त्याच्या सोबत असतो. खरंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अवघड काम हे जल्लादाचे असते. फाशी देण्याआधी जल्लाद कैद्याच्या कानात काहीतरी बोलतो ज्यानंतर तो दोरखंड सोडून देतो. यावेळी जल्लाद कानात म्हणतो की, 'हिंदूचा राम राम आणि मुस्लिमांना सलाम, मी माझ्या कामापुढे हतबल आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल अशी मी प्रार्थना करतो. '

इतर बातम्या - धक्कादायक! शिर्डीमध्ये आईसह 3 मुलांना विषबाधा, चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

Published by: Renuka Dhaybar
First published: December 10, 2019, 12:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading