S M L

मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच !

12 आणि त्याहून कमी वय असलेल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा मंजूर करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हा कायदा सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी एकत्र येऊन पारित केला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 5, 2017 10:07 AM IST

मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना  फाशीच !

05 डिसेंबर: मध्य प्रदेशमध्ये 12 आणि त्याहून कमी वय असलेल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा मंजूर करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हा कायदा सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी एकत्र येऊन पारित केला आहे.

राष्ट्रीय  गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार महिलाविषयक गुन्ह्यांमध्ये 11 टकक्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा कायदा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो आहे .  अल्पवयीन मुलींच्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षा सुनावणारं मध्य प्रदेश आता पहिलं राज्य ठरलं आहे.कायदे मंत्री  रामपाल सिंह यांनी या कायद्याचं विधेयक मांडलं होतं. आता दोन्ही सदनांनी  हे विधेयक पास केलेले असून  आता फक्त राष्ट्रपतींची मंजूरी बाकी आहे. हा दिवस मध्य प्रदेशच्या इतिहासातला दिवस  आहे असं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. जोपर्यंत शिक्षा कठोर होत नाही तोपर्यंत गुन्हे कमी होणार नाही असंही ते म्हणाले.

त्यामुळे आता या कायद्यानंतर इतर कुठली राज्य हा कायदा पास करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2017 09:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close