लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता फाशी!

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता फाशी!

या नव्या कायद्यानुसार 12 वर्षांखालच्या मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 डिसेंबर : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता फाशीची शिक्षा होणार आहे. पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्यात ही कठोर तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी अशा कठोर शिक्षेची मागणी केली होती. त्यानंतर तज्ज्ञ समितीने शिफारस केल्यानंतर केंद्राने हा मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

लहान मुलांवरच्या लैंगिक अत्याचांरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र त्या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद नव्हती. विविधा सामाजिक संघटनांनीही पॉस्को कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती.

या नव्या कायद्यानुसार 12 वर्षांखालच्या मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. अशा घटनांमध्ये आरोपी हे मुलांच्या जवळची माणसच असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. मुलाचे नातेवाईक, घरातले नोकर, ड्रायव्हर किंवा शाळेतल्या कर्मचाऱ्यांकडून अशी कृत्य केली जातात.

First published: December 28, 2018, 6:00 PM IST

ताज्या बातम्या