ओडिशामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, फोनवर बोलणाऱ्या तरुणीचा मृत्यू

ओडिशामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, फोनवर बोलणाऱ्या तरुणीचा मृत्यू

चार्जिंग सुरू असतानाच मोबाईलचा स्फोट झाल्याने एका 19 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

21 मार्च : चार्जिंग सुरू असताना मोबाईलचा वापर करू नये आणि केला तर त्याने काय होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण तरीही चार्जिंग सुरू असतानाच मोबाईलचा स्फोट झाल्याने एका 19 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. ओडिशामध्ये ही धक्कादायक घटना घडली.

फोन चार्जिंगला लावला त्यावेळी ही मुलगी फोनवर आपल्या नातेवाईकांशी बोलत होती. मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने या मुलीचा चेहेरा छिन्नविछिन्न झाला, तसेच तिचा पायही जखमी झाला. या मुलीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मोबाइल चार्जिंगला लावताच या फोनचा स्फोट झाला आणि या स्फोटात या तरूणीचा मृत्यू झाला. उमा ओरम असे या मुलीचे नाव होते. ओदिशामध्ये ही घटना घडली आहे. या मुलीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

First published: March 21, 2018, 9:32 AM IST

ताज्या बातम्या