S M L

पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

चिंतामण यांना उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दुर्दैवानं डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2018 01:25 PM IST

पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

30 जानेवारी : पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं नवी दिल्लीत निधन झालं आहे. ते 61 वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आहे. चिंतामण यांना उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दुर्दैवानं डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. वनगा हे भाजपचा आदिवासी चेहरा होते. त्यामुळे संपूर्म पालघरमध्ये शोककळा पसरली आहे.

चिंतामण वनगा हे 1996 साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 साली ते आमदार झाले. मग 2016 साली पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यावर ते पुन्हा खासदार म्हणून निवडले आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ते नवी दिल्लीत होते. आणि त्याच दरम्यान त्यांचे निधन झाले.

पाहूयात चिंतामण वनगांचा अल्पपरिचय- जन्म - 1 जून 1956

- जन्म ठिकाण - कवाडा, पालघर

- शिक्षण - एल.एल.बी.

Loading...
Loading...

- डहाणू-पालघरमध्ये वकिलीला सुरुवात

- मतदारसंघ - पालघर

- 1996 - पहिल्यांदा खासदारपदी निवड

- 1999 - दुसऱ्यांदा खासदारपद

- 2009 - आमदारपदी निवड (विक्रमगड मतदारसंघ)

- 2016 - नव्या पालघर जिल्ह्याचे पहिले खासदार

- भाजपचा आदिवासी चेहरा

- शांत आणि मनमिळावू स्वभाव

- अनेक मच्छीमारांना पाकमधून परत आणण्यात महत्वाची भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 01:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close