कोरोनामुळे भारतातील पहिल्या डॉक्टरचा मृत्यू, हॉटस्पॉट परिसरातच होतं वास्तव्य

कोरोनामुळे भारतातील पहिल्या डॉक्टरचा मृत्यू, हॉटस्पॉट परिसरातच होतं वास्तव्य

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशातील पहिल्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये ही घटना घडली आहे.

  • Share this:

इंदौर, 09 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात अडकून अनेकांचा बळी गेला आहे. भारतामध्ये देखील कोरोनाबाधितांंची संख्या वाढू लागली आहे. मात्र आता देशात कोरोना व्हायरसमुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे डॉ. शत्रुघ्न पंजवानी यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आज त्यांचा मृत्यू झाला असून आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर आधी गोकुलदास विभागात आणि त्यानंतर सीएचएलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनतर त्यांना अरविंदो हॉस्पीटलमध्ये हवलण्यात आले होते आणि आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

(हे वाचा-'फॉल्स निगेटिव्ह'ने वाढवली सरकारची चिंता, भारतासाठी धोक्याची घंटा)

कोरोनामुळे मृत्यू झालेले ते पहिले डॉक्टर आहेत मात्र ते कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांपैकी नव्हते. डॉ. पंजवानी इंदौरमधील रुपराम नगरमध्ये राहत होते. इंदौर शहर तसं पाहायला गेलं तर कोरोनासाठी हॉटस्पॉट आहे, आतापर्यंत याठिकाणी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. इंदौरमध्ये याआधी बुधवारी दोन आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचं देखील निदर्शनास आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार यातील एक अधिकारी भोपाळमध्ये कार्यरत आहे तर दुसरे अधिकारी इंदौरमध्येच कार्यरत आहेत. याआधी दोन आयएएस अधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते

(हे वाचा-मोठ्या वादंगानंतर मरकज प्रकरणाबाबत मोदी सरकारने घेतली महत्त्वपूर्ण भूमिका)

बुधवारी रात्रीपर्यंत मध्यप्रदेशात एकूण 385 लोकं कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 213 इंदौरमधील आहेत. तर  94 भोपाळमधील आहेत. आतापर्यंत एकूण 29 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाच्या हॉटस्पॉट परिसरांपैकी इंदौर हे एक महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे शहरामध्ये चिंतेचं वातावरण आहे.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: April 9, 2020, 12:44 PM IST

ताज्या बातम्या