Home /News /national /

Super Tigress चा मृत्यू, नावावार होतं अनोखं रेकॉर्ड; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

Super Tigress चा मृत्यू, नावावार होतं अनोखं रेकॉर्ड; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

‘कॉलरवाली वाघिण’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती.

    भोपाळ, 16 जानेवारी: पेंच राष्ट्रीय उद्यानातील (Pench National Park) ‘सुपर मॉम’, (Super Mom) ‘कॉलरवाली वाघीण’ (Tigress with Collar)आणि ‘पेंचची राणी’ अशा अनेक विश्लेषणांची ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा मृत्यू (Death) झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही वाघीण आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना तिच्याकडून मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला आणि तिचा अखेर मृत्यू झाला. पेंच राष्ट्रीय उद्यानातील सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम तिच्या नावे आहे. 29 बछड्यांची आई या वाघिणीचा जन्म सप्टेंबर 2005 मध्ये झाला होता. 2006 साली तिने तीन बछड्यांना जन्म दिला होता. मात्र त्यावेळी पाण्यात बुडून तिन्ही बछड्यांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी वाघिणीनं पुन्हा 4 बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर तिने एकाच वेळी 5 बछड्यांना जन्माला घातलं. त्यानंतर सलग दोनवेळा तिने तीन-तीन बछड्यांना जन्म दिला. एप्रिल 2015 मध्ये तिने पुन्हा 4 बछड्यांना जन्म दिला. या जन्मांनंतर तिच्या नावे पेंचमधील सर्वाधिक बछडे जन्माला घालणारी वाघिण असा विक्रम नोंदवला गेला. त्यानंतर ती स्वतःचेच विक्रम मोडत राहिली. 2017 मध्येही आणखी चार बछडे या वाघिणीच्या पोटी जन्माला आले, तर याच महिन्यात 4 बछड्यांचा जन्म तिच्या पोटी झाला होता.  मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली पेंचच्या जंगलात कॉलरवाल्या वाघिणीची डरकाळी कायम घुमत राहिल, अशी श्रद्धांजली मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वाहिली आहे. तर मध्यप्रदेशला ‘टायगर स्टेट’चा दर्जा मिळवून देण्यात या वाघिणीचा मोठा सहभाग होता, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.  हे वाचा - असं पडलं नाव 11 मार्च 2008 या दिवशी डेहराडूनच्या काही तज्ज्ञांनी या वाघिणीला बेशुद्ध करून तिच्या शरीरात रेडिओ कॉलर ट्रान्सप्लँट केला होता. त्यावरूनच तिचं नाव कॉलरवाली वाघीण असं पडलं होतं. या वाघिणीचा बाप असलेल्या वाघाला चार्जर या नावानं ओळखलं जात असे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Death, Madhya pradesh, Tiger

    पुढील बातम्या