मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुंबईला जाताना ट्रेनमध्ये तरुणाची अचानक तब्येत बिघडली; पुढील स्टेशन येईपर्यंत दुर्देवी मृत्यू

मुंबईला जाताना ट्रेनमध्ये तरुणाची अचानक तब्येत बिघडली; पुढील स्टेशन येईपर्यंत दुर्देवी मृत्यू

पती-पत्नी दोघेही ट्रेनने मुंबईला जात होते. अचानक पतीची तब्येत बिघडली.

पती-पत्नी दोघेही ट्रेनने मुंबईला जात होते. अचानक पतीची तब्येत बिघडली.

पती-पत्नी दोघेही ट्रेनने मुंबईला जात होते. अचानक पतीची तब्येत बिघडली.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 11 फेब्रुवारी : राजस्थानातील (Rajasthan News) जोधपुरमधून मुंबईला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसमधून प्रवास करणारा आणि जोधपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ती व्यक्ती आपल्या पत्नीसह जोधपूरहून मुंबईला जात होते. प्रवासादरम्यान त्याची तब्येत बिघडली. पालनपूरला पोहोचल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूर निवासी 53 वर्षीय नरेंद्र जैन आपली पत्नी पद्मासह सुर्यनगरी एक्सप्रेसने जोधपूरहून मुंबईला जात होते. आबूरोडहून ट्रेन रवाना झाल्यानंतर नरेंद्र जैनला उलट्या सुरू झाल्या आणि त्याची तब्येत खूप बिघडली. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनी गार्डच्या माध्यमातून पालनपूर रेल्वे स्टेशनवर याबाबत सूचना दिला. रात्री 1 वाजता ट्रेन पालनपूरला पोहोचली, त्यावेळी तेथे आधीच एक रुग्णवाहिका तयार होती.

हे ही वाचा-बाप-मुलगा रात्री पित होते दारू; दुसऱ्या दिवशी रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृत

जैनला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर ट्रेन तब्बल 4 तास पालनपूर स्टेशनवर उभी राहिली. पोलिसांनी सांगितलं की, ट्रेनमध्ये अचानक तब्येत बिघडल्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Heart Attack, Indian railway