आग्रा, 26 नोव्हेंबर : आग्र्यातील ताज शहरातील एका निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. येथील एका रुग्णाचं स्टोनचं ऑपरेशन (Stone Operations) करायचं होतं. ऑपरेशन दरम्यान डॉक्टर रुग्णाच्या पोटातच सर्जिकल ब्लेड विसरला. ऑपरेशननंतर जेव्हा तरुणाच्या पोटात दुखू लागलं तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला.
पोटात दुखू लागल्याने तरुणाला आग्र्याच्या बाहेर दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. येथे एक्सरे केल्यानंतर तरुणाच्या पोटात सर्जिकल ब्लेड असल्याचे दिसले. या कारणामुळे त्याला वेदना होत आहेत. याची तक्रार केल्यानंतर उलट डॉक्टरच रुग्णासोबत वाईट व्यवहार करू लागले. त्यानंतर रुग्णाने याबाबात आग्रा न्यायालयात (Agra Court) केस दाखल केली. आता न्यायालयाने मौर्य रुग्णालयाचे डॉक्टर सिद्धार्थ धर मौर्य (Dr. Siddharth Dhar Maurya) यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
आग्र्यातील कौशलपुरी स्थित मौर्य रुग्णालयात गौरव कुशवाह स्टोनचं ऑपरेशन करण्यासाठी गेले होते. ऑपरेशननंतरही त्यांच्या पोटात सतत वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांनी पुन्हा डॉक्टरकडे जाऊन औषधं घेतली. मात्र तरीही त्याला आराम मिळत नव्हता. यामुळे रुग्णाने दिल्लीत तपासणी करण्याचं ठरवलं. त्यावेळी तपासणीदरम्यान त्याच्या पोटात सर्जिकल ब्लेड असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. पीडित रुग्णाने जेव्हा मौर्य रुग्णालयात याबाबत तक्रार केली तर त्याला वाईट वागणूक देण्यात आली. सर्व बाजूंनी हताश झालेल्या रूग्णाने आग्राच्या कोर्टात धाव घेतली. या प्रकरणात कडक भूमिका घेत कोर्टाने न्यू आग्रा पोलिसांना मौर्य हॉस्पिटलचे डॉक्टर सिद्धार्थ धर मौर्य यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले. यापूर्वी डॉक्टरांच्या दुर्लक्षाच्या अनेक घटना आग्रामध्ये नोंदल्या गेल्या आहेत, परंतु ऑपरेशन दरम्यान ब्लेड पोटात सोडल्याची ही पहिलीच घटना आहे.
हे ही वाचा-लग्नाच्या आनंदात विरजण; वरातीत घोड्यावर बसलेला नवरदेव थेट पोहोचला पोलीस ठाण्यात
डॉक्टरांचा परवाना रद्द करा
आग्रा येथील रामनगर येथे राहणारे गौरव कुशवाह याचा खटला लढवणारे अॅडव्होकेट पवन कुमार गौतम यांचं म्हणणं आहे की, अशा गंभीर निष्काळजीपणावर डॉ.सिद्धार्थ धर मौर्य यांचा परवाना रद्द करावा. अॅडव्होकेट गौतम पुढे म्हणाले की, कोर्टाने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. न्यायदंडाधिकारी रुमाना अहमद यांनी न्यू आग्रा पोलीस ठाण्याला आरोपीविरोधात विविध गंभीर कलमांबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.