भोपाळ, 13 मे : एखाद्याची चिता रचली आहे. त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
(Funeral) करण्याचीही तयारी झाली. अंत्यसंस्कार होणार त्याआधीच मृतदेहाची
(Deadbody) हालचाल होणं, त्याचे हात हलणं, त्याने डोळे उघडणं किंवा पूर्ण मृतदेहच ताडकन उठून बसणं... बऱ्याचदा हॉरर फिल्म किंवा सीरिअलमध्ये तुम्ही असा सीन पाहिलाच असेल. तो ऑनस्क्रिन पाहूनही तुम्हाला घामही फुटला असेल. मग विचार करा, जर प्रत्यक्षात असं घडलं तर... काय फक्त कल्पना करूनच तुमचं शरीर गार पडलं ना? पण मध्य प्रदेशात अशी घटना वास्तवात घडली आहे.
मध्य प्रदेशच्या
(Madhya pradesh) अशोकनगर जिल्ह्यात गुरुवारी एका मृतदेहाला स्मशानात नेण्यात आलं. तिथं त्याच्यावर अंत्यस्कार होत होते. इतक्यात त्या मृतदेहातून आवाज येऊ लागला. मृतदेह चक्क बोलत होता आणि नंतर काय तर तो चितेवरच उठून बसला.
अनिल जैन नावाच्या या व्यक्तीची प्रकृती बिघडली म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आज तकच्या रिपोर्टनुसार मृताच्या भावाने त्याला कोरोना असल्याचं सांगितलं. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर 15 दिवस उपचार करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
हे वाचा - बाळाच्या तोंडात इतकं मोठं छिद्रं पाहून बसला धक्का; कारण वाचून तर पुरते हादराल
जेव्हा त्याला स्माशनभूमीत नेलं तेव्हा त्याच्या शरीराची हालचाल झाली. ओम, ओमचा आवाजही ऐकू आला आणि तो उठून बसला, असं मृताच्या भावाने सांगितलं. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्सला फोन केला. त्यांनी ती व्यक्ती मृत असल्याचं सांगितलं. पण नातेवाईक ऐकायला तयार नाहीत. म्हणून ते पुन्हा मृतदेह घेऊन जिल्हा रुग्णालयात गेले. तिथं त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि तो मृत असल्याचंच सांगण्यात आला.
हे वाचा - ठाण्यात पत्र्याच्या पेटीत आढळला पुरुषाचा मृतदेह
रुग्ण रुग्णालयात जिवंत होता असं म्हणत नातेवाईकांनी रुग्णालयावर बेजबाबदारपणाचा आरोप लावला. पण सिव्हील सर्जननी हा आरोप फेटाळला आहे. स्मशानभूमीतून पुन्हा आणल्यानंतरही ती व्यक्ती मृतच होती, असं डॉक्टरांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.