Home /News /national /

प्रेयसीच्या भावानं फोन करून बोलावलं, तीन दिवसांनी मिळाला तरुणाचा मृतदेह

प्रेयसीच्या भावानं फोन करून बोलावलं, तीन दिवसांनी मिळाला तरुणाचा मृतदेह

Bihar Crime News गावातील प्रतिष्ठीत (मुखिया) व्यक्तीच्या मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होत आणि त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिथिलेश 7 जूनपासून बेपत्ता होता.

    समस्तीपूर(बिहार), 10 जून : बिहारच्या समस्तीपूरमधून (Bihar Samastipur) तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी गुरुवारी (young boy found dead) आढळला. प्रेमप्रकरणातून त्याची हत्या झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिथिलेश कुमार असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याचं गावातील प्रतिष्ठीत (मुखिया) व्यक्तीच्या मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होत आणि त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिथिलेश 7 जूनपासून बेपत्ता होता. (वाचा-GOLD MAN दत्ता फुगे खून प्रकरणी आणखी दोन अटकेत, पोलिसांनी सापळा रचून पकडले) हसनपूर परिसरात असलेल्या धोबौलिया गावातील हे प्रकरण आहे. मिथिलेश त्याच्या घरून तीन दिवसांपूर्वी 7 जूनला बेपत्ता झाला होता. तको बेपत्ता झाल्यानंतर त्याचे वडील चंद्रशेखर राम यांच्यासह नातेवाईकांनी दोन दिवस त्याचा शोध घेतला. सापडला नाही म्हणून अखेर 9 तारखेला पोलिसांत तक्रार दिली. पोलिस तपास करत असतानाच गुरुवारी मिथिलेशच्या घरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर काही जणांना गावातील शाळेच्या मागे कालव्यात एक मृतदेह आढळला. (वाचा-शिक्षक नव्हे भक्षक! दोन शिक्षकांचा चिमुरडीवर अत्याचार, गर्भवती राहिली अन्..) पोलिसांना ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर मिथिलेशचे कुटुंबीयही त्याठिकाणी पोहोचले आणि मृतदेह मिथिलेशचाच असल्याचं स्पष्ट झाला. मिथिलेशच्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिथिलेशच्या भावानं आरोप केला की, गावाचे प्रमुख (मुखिया) कारी साह यांच्या मुलीशी मिथिलेशचं प्रेम प्रकरण होतं. 7 जूनला मुलीच्या भावानं फोन करून मिथिलेशला बोलावलं होतं. तेव्हापासून तो बेपत्ता होता. यातूनच त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिथिलेशचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्यांनी हसनपूर-सखवा मार्ग रोखून धरला होता. पोलिसांचत्या विरोधातही कारवाई करत नसल्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली. पण पोलिसांनी समजावत गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन देत त्यांना शांत केलं, आणि रस्ता मोकळा केला. याप्रकरणी पोलिस सध्या पुढीत तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Murder

    पुढील बातम्या