Home /News /national /

खळबळजनक! बहीण - भावाचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत, आत्महत्येपूर्वी केलं लग्न?

खळबळजनक! बहीण - भावाचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत, आत्महत्येपूर्वी केलं लग्न?

तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली असून दोघांनी आत्महत्येपूर्वी लग्न केल्याची शक्यता आहे.

    इटाह, 22 एप्रिल : उत्तर प्रदेशात बागवाला भागातील एका गावात तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दोघेही चुलत भाऊ- बहीण आहेत. दरम्यान, घटनास्थळावर कुंकवाची डबी आणि मुलीने कुंकू लावलेलं आढळलं. यामुळे दोघांनी लग्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चुलत बहिण भावांचे एकमेकांवर प्रेम होते. याला कुटुंबियांचा विरोध होता. घटनास्थळी पोलिसांना कुंकुवाची डबी सापडली. दोघांचे मृतदेह खाली उतरवल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याबाबतची बातमी न्यूज 18 हिंदीने दिली आहे. इटाहमधील एक लहानसं गावं असलेल्या खड्डुआमध्ये जेव्हा ही घटना समजली तेव्हा खळबळ उडाली. गावाच्या बाहेर असेलल्या एका झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर लोकांची या ठिकाणी गर्दीही जमली होती. आत्महत्या की हत्या याबाबत अजुनही स्पष्ट समजू शकलेले नाही. दरम्यान, या दोघांच्याही प्रेमाला घरच्या लोकांचा विरोध होता अशी माहिती मिळते. हे वाचा : चीनमध्ये 2 महिन्यांनंतरही शरीरात व्हायरस जिवंत, बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासानंतर दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. दोघांनी आत्महत्येपुर्वी लग्न केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी एसएसपी सुनिल कुमार सिंग यांनी सांगितलं की, तरुण-तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतले.घटनेची चौकशी केली जात आहे. आत्महत्या की ऑनर किलिंग याबाबत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समजू शकेल असंही एसएसपी म्हणाले. हे वाचा : कोरोनाग्रस्तांची सेवा करताना मृत्यू, डॉक्टरची अखेरची इच्छाही राहिली अधुरी संकलन, संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या