• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आईवडील जबरदस्तीने लावत होते मुलीचं लग्न; चालत्या रेल्वेत थरार, महिला आयोगाने अशी केली सुटका

आईवडील जबरदस्तीने लावत होते मुलीचं लग्न; चालत्या रेल्वेत थरार, महिला आयोगाने अशी केली सुटका

आपल्या मुलीचं जबरदस्तीनं लग्न (DCW recues a girl taken by parents for marriage forcefully )लावण्यासाठी तिला रेल्वेतून घेऊन चाललेल्या आईवडिलांना गाठत मुलीची सुटका करण्यात यश आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : आपल्या मुलीचं जबरदस्तीनं लग्न (DCW recues a girl taken by parents for marriage forcefully) लावण्यासाठी तिला रेल्वेतून घेऊन चाललेल्या आईवडिलांना गाठत मुलीची सुटका करण्यात यश आलं आहे. दिल्लीच्या महिला आयोगाच्या सतर्कतेमुळे एका (Girl rescued at railway station) मुलीची जबरदस्तीच्या लग्नातून सुटका झाली आहे. मुलीचं लग्न होण्यापूर्वीच दिल्ली पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीनं महिला आयोगानं ही मोहडली. काय होतं प्रकरण? दिल्ली एनसीआर मधील एका महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणीचं तिचे आईवडील जबरदस्तीनं लग्न लावत होते. 26 ऑक्टोबर रोजी या तरुणीच्या मित्राने महिला आयोगाच्या कार्यालयात फोन करत याची कल्पना दिली. मुलीचे आईवडील तिला रेल्वेनं झारखंडला नेणार असल्याची माहितीही महिला आयोगाला मिळाली. मुलीला रेल्वेतूनच ताब्यात घेऊन तिची सुटका करण्याचा प्लॅन आय़ोगाच्या अधिकाऱ्यांनी आखला. पोलिसांशी केला संपर्क महिला आयोगाने दिल्ली पोलिसांसोबत एक टीम तयार केली आणि 27 तारखेला ट्रेनमधून मुलीची सुटका करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर धाड टाकण्याची तयारी केली. रेल्वेत बसण्यापूरवीच मुलीला ताब्यात घेण्याची मूळ योजना होती. मात्र ही टीम रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच मुलगी आणि तिचे आईवडील रेल्वेत बसल्याचं टीमला समजलं. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाला संपर्क करत रेल्वे थांबवून ठेवण्यात आली आणि मुलीची सुटका करण्यात आली. हे वाचा- माकडाने पळवला चष्मा, परत मिळवण्यासाठी द्यावी लागली लाच; पाहा VIDEO मुलीला शिकायचाय कायदा 23 वर्षांची ही तरुणी सध्या कायद्याचं शिक्षण घेत असून आपल्याला शिक्षण आणि करिअर करण्याची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं आहे. आपले आईवडील झारखंडमधील एका तरुणाशी आपलं लग्न लावून देत होते. मात्र आपल्याला हे लग्न मान्य करल्याचं तिनं म्हटलं आहे. लग्नाला विरोध केल्यामुळे अनेक दिवसांपासून आपल्याला घराबाहेरही सोडण्यात आलं नव्हतं, असं या तरुणीनं पोलिसांनी सांगितलं. महिला आयोगानं या मुलीची सुटका केली असून काही दिवसांसाठी तिला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: