मुंबई, 20 मे: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. रविवारी जाहीर झालेल्या या एक्झिट पोलनंतर सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील 11 हजार 648 अंकांवर पोहोचला.
केंद्रात कोणाचे सरकार येणार याचा फैसला २३ मे रोजी होणार असला तरी एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. या पोलला शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. देशात पु्न्हा एकदा मोदी सरकार येणार यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने ही तेजी आली आहे.
वाचा संबंधित बातमी- EXIT POLLमुळे NDAमध्ये उत्साह, सर्व पक्षांची बोलावली बैठक
गेल्या निवडणुकीत यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा; यावेळीचा Exit Poll आहे असा!
VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू