Home /News /national /

मालमत्तेच्या लिलावानंतर दाऊद खवळला, दिली बाॅम्बस्फोटांची धमकी

मालमत्तेच्या लिलावानंतर दाऊद खवळला, दिली बाॅम्बस्फोटांची धमकी

आपली मालमत्ता सैफी बुऱ्हानी ट्रस्टनं विकत घेतल्यामुळे दाऊद इब्राहिम खवळल्याची बातमी आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दाऊदच्या माणसाचा फोन आला होता.

16 नोव्हेंबर : आपली मालमत्ता सैफी बुऱ्हानी ट्रस्टनं विकत घेतल्यामुळे दाऊद इब्राहिम खवळल्याची बातमी आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दाऊदच्या माणसाचा फोन आला होता. वेळ पडली तर 1993च्या स्फोटांची पुनरावृत्ती करू, अशी धमकी दाऊदच्या माणसानं दिल्याचा दावा या प्रतिनिधीनं केलाय. याबाबतचे पुरावे पोलिसांना दिले आहेत, तपास सुरू आहे. या आधीचा इतिहास पाहता, जेव्हा जेव्हा दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात ज्यांनी कोणी बोली लावल्या, त्यांना दाऊदच्या माणसांनी धमक्या दिल्यात. काल झालेल्या लिलावात सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्टनं या तीनही मालमत्ता विकत घेतल्यात. एकूण 11 कोटींना या मालमत्ता विकल्या गेल्या आहेत.  भेंडी बाजार परिसराचा पुनर्विकास सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्ट करणार आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आलाय.
First published:

Tags: Threatening call, दाऊद, धमकी

पुढील बातम्या