डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतल्या तुरूंगात हल्ला, प्रकृती गंभीर

डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतल्या तुरूंगात हल्ला, प्रकृती गंभीर

मुंबईवरच्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला एक सूत्रधार डेव्हिड हेडलीवर तुरूंगातल्या कैद्यांनीच हल्ला केल्याची माहिती समोर आलीय. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.23 जुलै : मुंबईवरच्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला एक सूत्रधार डेव्हिड हेडलीवर तुरूंगातल्या कैद्यांनीच हल्ला केल्याची माहिती समोर आलीय. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. हेडली हा या प्रकरणातला माफीचा साक्षीदार असून शिकागोमधल्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक असलेला हेडली हा दहशतवादाच्या खटल्यात आरोपी होता. 8 जुलैला शिकागोतील तुरुंगात डेव्हिड हेडलीवर 2 कैद्यांनी हल्ला केला होता. हेडली हा पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी डबल एजंट म्हणून काम करत होता. 92 मधील बाबरी पतनानंतर सूड म्हणून भारतातील मंदिरांवर हल्लाचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता. त्याचबरोबर गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याची कबुली हेडलीनं दिली होती.

हेही वाचा...

VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

जमावाकडून होणाऱ्या हत्येंविरोधात केंद्र करणार कायदा

राहुल गांधी हे 'नफरत के सौदागर', पीयुष गोयल यांचा पलटवार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 09:30 PM IST

ताज्या बातम्या