मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुलीनेच प्रियकराला दिली वडिलांच्या हत्येची सुपारी; धक्कादायक कारण आलं समोर

मुलीनेच प्रियकराला दिली वडिलांच्या हत्येची सुपारी; धक्कादायक कारण आलं समोर

राजस्थानमध्ये (Rajasthan) अशाच एका मद्यपी पित्याला त्रासलेल्या मुलीने त्याची हत्या (Murder) करायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

राजस्थानमध्ये (Rajasthan) अशाच एका मद्यपी पित्याला त्रासलेल्या मुलीने त्याची हत्या (Murder) करायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

राजस्थानमध्ये (Rajasthan) अशाच एका मद्यपी पित्याला त्रासलेल्या मुलीने त्याची हत्या (Murder) करायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

    जयपूर, 9 जुलै : दारू पिण्याच्या वाईट सवयीमुळे माणूस कर्जबाजारी होऊ शकतो. राजस्थानमध्ये (Rajasthan) अशाच एका मद्यपी पित्याला त्रासलेल्या मुलीने त्याची हत्या (Murder) करायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताचं नाव राजेंद्र मीणा असून, ते शिक्षक होते. मुलीचं नाव शिवानी असून, तिने तिचा प्रियकर अतुल याला वडिलांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना कोटा शहरात 25 जून रोजी घडली होती. या प्रकरणी मुलगी, तिचा प्रियकर आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोटा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कवेंद्रसिंह सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजेंद्र मीणा यांना दारूचं व्यसन होते आणि या व्यसनामुळेच त्यांनी लाखो रुपयांचं कर्ज (Loan) घेतलं होतं. पैसे मागण्यासाठी लोक रोज त्यांच्या घरी यायचे. राजेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नीला त्यांनी घेतलेलं कर्ज फेडायला सांगायचे. त्यांनी पहिल्या पत्नीच्या नावावर सुलतानपूरमध्ये घर बांधलं होतं आणि कर्ज फेडण्यासाठी ते घर विकण्याचाही त्यांचा विचार सुरू होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणं झाली होती. दरम्यान, राजेंद्र यांच्या या व्यसनामुळे आणि कर्जामुळे मुलगी शिवानीही त्रासली होती. वडील घर विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच शिवानीला राग आला. तिने हा सगळा प्रकार प्रियकर अतुलला सांगितला आणि वडिलांना मारण्याचा कट रचला. प्रेम करणं तरुणाला पडलं महागात; सख्ख्या भावानेच घेतला जीव, नागपुरातील दुहेरी हत्याकांडात मोठा खुलासा 'मारण्याचं काम मी एकटा करू शकत नाही. त्यासाठी पाच मुलं मदतीला लागतील आणि त्यांना पैसे द्यावे लागतील,' असं अतुलने सांगितलं. त्यानंतर शिवानीने 50 हजारांची व्यवस्था केली आणि ते पैसे अतुलला दिले. घटनेच्या 15 दिवस आधी अतुलने मित्रांसोबत राजेंद्र यांच्या हत्येचा कट रचला. सरकारी शाळेला सुटी असल्याने राजेंद्र आई-वडिलांसोबत गावात राहत होते. 25 जून रोजी शाळा उघडली तेव्हा पहाटे तीन वाजता ते त्यांच्या गावावरून निघाले. नंतर ते पहिली पत्नी सुगनाबाईला भेटले. पुढे तिथून ते शाळेत जायला निघाले. याबद्दलची सर्व माहिती शिवानीने प्रियकर अतुलला फोनवर दिली. त्यानंतर आरोपी अतुलने त्याच्या साथीदारांसह राजेंद्र यांना रॉड आणि काठ्यांनी मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशी ही 'दुर्गा', दारुड्या नवऱ्याला जेलमधून सोडण्यासाठी महिलेचा किळसवाणा धिंगाणा यानंतर पोलिसांनी शिवानी आणि अतुल यांच्यासह विजय माली, ललित मीणा आणि विष्णू भील अशा पाच आरोपींना अटक केली. सध्या अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची चौकशी सुरू आहे.
    First published:

    Tags: Crime news, Murder, Rajasthan

    पुढील बातम्या