मराठी बातम्या /बातम्या /देश /माणुसकीचं दर्शन; स्वतःचा जीव धोक्यात घालत कोरोनाबाधित सासऱ्याला खांद्यावर उचलून नेणाऱ्या सुनेचे PHOTOS VIRAL

माणुसकीचं दर्शन; स्वतःचा जीव धोक्यात घालत कोरोनाबाधित सासऱ्याला खांद्यावर उचलून नेणाऱ्या सुनेचे PHOTOS VIRAL

फोटोमध्ये दिसणाऱ्या निहारीकाचा पती आणि थुलेश्वर दास यांचा मुलगा सुरज हा कामानिमित्त घरापासून दूर राहातो. त्यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारीकाच आपल्या सासऱ्यांची काळजी घेते.

फोटोमध्ये दिसणाऱ्या निहारीकाचा पती आणि थुलेश्वर दास यांचा मुलगा सुरज हा कामानिमित्त घरापासून दूर राहातो. त्यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारीकाच आपल्या सासऱ्यांची काळजी घेते.

फोटोमध्ये दिसणाऱ्या निहारीकाचा पती आणि थुलेश्वर दास यांचा मुलगा सुरज हा कामानिमित्त घरापासून दूर राहातो. त्यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारीकाच आपल्या सासऱ्यांची काळजी घेते.

गुवाहाटी 04 जून : कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना घराबाहेर काढलं तर अनेकांनी आपल्याच माणसांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पाहायला मिळाल्या. मात्र, आता समोर आलेली एक घटना अत्यंत कौतुकास्पद आहे. या घटनेत एका सुनेनं आपल्या कोरोनाबाधित सासऱ्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून रुग्णालयत नेलं (Daughter-in-law Carried her Covid Positive Father in-law on Shoulder to Hospital) . आसाममधील या महिलेचं सगळीकडेच कौतुक होत आहे.

या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या निहारीकाचा पती आणि थुलेश्वर दास यांचा मुलगा सुरज हा कामानिमित्त घरापासून दूर राहातो. त्यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारीकाच आपल्या सासऱ्यांची काळजी घेते. नुकतंच तिच्या 75वर्षीय सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली. ते भाटीगावच्या राहा येथील रहिवासी आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर निहारीकानं आपल्या सासऱ्यांना खांद्यावर उचलून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तिलादेखील कोरोनाची लागण झाली.

यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांनी जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितलं आणि निहारीकाला होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला. मात्र, आपल्या वृद्ध सासऱ्यांना एकट्याला रुग्णालयात पाठवण्यास निहारीकानं नकार दिला. त्यामुळे, डॉ. संगीता धर आणि आरोग्य कर्मचारी पिंटू हिरा यांनी प्राथमिक वैद्यकीय उपचार करत दोघांनाही रुग्णवाहिकेनं नागाव भोगेश्वरी फुकानानी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. निहारीकानं आपल्या पतीच्या अनुपस्थितीत सासऱ्यांची घेतलेली काळजी आणि कोरोना काळातही त्यांच्यासाठी केलेली धडपड यांचं सगळ्यांकडून कौतुक होत आहे.

First published:
top videos

    Tags: Corona patient, Corona spread, Photo viral