बंगळुरु, 31 डिसेंबर: कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरू (Bangalore) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सावत्र वडिलांच्या प्रेमात पडल्यानं मुलीनं आपल्या जन्मदात्या आईचा संपवलं. दोघांनी मिळून मालमत्ता (property) हडपण्याच्या नादात आईची हत्या केली आहे. (Bengaluru Murder) पोलिसांनी असा दावा केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत पिता-मुलीसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही हत्या 27 डिसेंबर रोजी झाली होती. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने अर्चना रेड्डी यांना तिच्या कारमधून ओढळून आणि तिच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला.
हेही वाचा- Good Bye..! समीर वानखेडेंचा आज NCB ला अलविदा, असा होता कार्यकाळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या पहिल्या पतीची 21 वर्षीय मुलगी तिच्या दुसऱ्या पतीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, 33 वर्षीय नवीन आणि 21 वर्षीय युविका रेड्डी वडिलोपार्जित संपत्तीत आपला हिस्सा मागत होते. पण मृत अर्चना रेड्डी तो हिस्सा द्यायला तयार नव्हती. त्यामुळे दोघांनी मिळून अर्चनाची हत्या केली. तिची हत्या झाली तेव्हा अर्चना यांचा मुलगाही त्यांच्यासोबत कारमध्ये होता. हा मुलगा पहिल्या पतीपासून होता.
घटस्फोट, लग्न आणि नंतर पुन्हा घटस्फोट
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतर अर्चनाने जिम ट्रेनरसोबत लग्न केलं. मात्र, काही महिन्यांपूर्वी नवीनचे युविका म्हणजेच तिच्या मुलीसोबत अफेअर असल्याचं तिला समजले. यानंतर महिलेनं नवीनला घराबाहेर हाकलून दिलं. त्यानंतर युविकानंही नवीनसोबत राहण्यासाठी घर सोडलं. मात्र, दोघांचीही पैशांची कमतरता सुरू झाली. प्रत्यक्षात अर्चनाने युविका आणि नवीन या दोघांना पैसे देणं बंद केलं होतं.
संपत्तीसाठी वाद
सूत्रांनी पुढे सांगितलं की, युविकाने तिच्या आईकडे संपत्तीतील हिस्सा मागायला सुरुवात केली. मात्र अर्चनानं तसे करण्यास नकार दिला. त्याचवेळी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाची रोहित नावाच्या आणखी एका व्यक्तीशी मैत्री झाली होती. ज्याच्यासोबत ती नवीनला त्रास देण्याचा कट रचत होती. याची माहिती युविकाला समजल्यानंतर तिने नवीनला माहिती दिल्याचे समजते.
असा रचला हत्येचा कट
नवीनने त्याच्या मित्रांसोबत मिळून अर्चनाची हत्या करण्याचा कट रचला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, अर्चना श्रीमंत कुटुंबातील असून तिच्याकडे बरीच वडिलोपार्जित मालमत्ता होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “युविका आणि नवीनने पैशासाठी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले असले तरी, नवीनच्या मित्रांचा हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही. ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग होती की आणखी काही वेगळा हेतू होता का हे जाणून घ्यायला हवे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bengaluru, Crime news, Murder