गुजरात सीमेवर जप्त केलेल्या हेरॉईनमागे दाऊद इब्राहिमचा हात?

गुजरात सीमेवर जप्त केलेल्या हेरॉईनमागे दाऊद इब्राहिमचा हात?

दाऊद आणि एका देशांतर्गत टोळीचा या प्रकरणात हात असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

  • Share this:

पोरबंदर, 31 जुलै: गुजरातमध्ये नौदलाने जप्त केलेल्या हेरॉईनच्या व्यापारामागे दाऊद इब्राहिमचा हात असल्याची शंका नौदलाने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू असून दाऊद आणि एका देशांतर्गत टोळीचा या प्रकरणात हात असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

भारतीय नौदलाच्या तटरक्षक दलाने केलेल्या एका व्यापारी नौकेवर केलेल्या कारवाईत तब्बल दीड हजार किलो हेरॉईन जप्त केली होती. या जप्तीतल्या ड्रग्जची किंमत 3500 कोटी इतकी आहे.

हेरॉईन घेऊन व्यापारी नौका येणार असल्याची गुप्त माहिती तटरक्षक दलाला मिळाली होती. त्या माहितीनुसार गुजरातच्या समुद्रात तटरक्षक दलाच्या पावक आणि अंकित या जहाजांनी ही कारवाई केली. सध्या तरी या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे

First published: July 31, 2017, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading