दिलासा! आधार - पॅन लिंक करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय

दिलासा! आधार - पॅन लिंक करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय

तुम्ही अद्याप पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर घाबरू नका.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मार्च : आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख. पण, अद्यापही अनेकांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेलं नाही. पण, आता आधार आणि पॅन लिंक करण्याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला असून ज्यांनी अद्यापही आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेलं नाही त्यांना दिलासा मिळाला आहे. कारण, आधार कार्ड - पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारनं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढवली आहे. पण, रिटर्न फाईल करणाऱ्यांना मात्र यातून दिलासा मिळालेला नाही. कारण, आयटी रिटर्न फाईल करताना आधार कार्ड - पॅन कार्ड लिंक असणं गरजेचं आहे.

या स्टेप्स वापरा आणि पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करा

- तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणी केली नाही, तर तुमचे पॅन कार्ड रद्द केला जाऊ शकते. त्यामुळे पॅन कार्ड रद्द होऊ नये, असे वाटत असल्यास पॅन-आधार कार्डची जोडणी दिलेल्या कालावधीत न विसरता करून घ्या.

- पॅन-आधार जोडणी न केल्यास आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत तुमचे पॅन कार्ड अवैध मानले जाईल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पॅन-आधार जोडणी न झाल्यास तुम्ही ऑनलाइन आयकर परतावा (ITR)भरू शकत नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सोबत पॅन कार्डदेखील अवैध मानले जाईल.

- तुमचे अकाउंट जर उघडलेले नसेल तर सर्वात आधी ते रजिस्टर करून घ्या. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.(www.incometaxindiaefiling.gov.in)

- वेबसाइटवर 'लिंक आधार' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन करून आपल्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला 'आधार कार्ड लिंक' पर्याय दिसेल, हा पर्याय निवडावा.

- आपल्या आधार कार्डवरील क्रमांक आणि कोड भरावा. आवश्यक ती माहिती वेबसाइटवर भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. याद्वारे तुमचे आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडला जाईल.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

First published: March 31, 2019, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading