प्रियांका गांधी पंतप्रधान होणार; 1993ची भविष्यवाणी खरी ठरणार?

प्रियांका गांधी पंतप्रधान होणार; 1993ची भविष्यवाणी खरी ठरणार?

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी: काँग्रेसने प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशमधील जबाबदारी सोपवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्या निवडणूक लढणार अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. अशातच आता थेट त्या पंतप्रधान होतील, असे भाकीत वर्तवले जात आहे. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या म्हणून प्रियांका पंतप्रधान होणार अशी चर्चा सुरु झाली नाही. तर त्या पंतप्रधान होणार हे 1993मध्ये सांगण्यात आले होते.

निवडणुका जवळ आल्या की राजकीय नेते ज्योतिष शास्त्रावर अधिक विश्वास ठेवू लागतात. एखाद्या ज्योतिषीच्या सल्ल्याने अर्ज भरण्यापासून ते प्रचार कधी करायचा हे ठरवले जाते. या काळात अनेक ज्योतिषी राजकीय भाकीत देखील करतात. प्रियांका गांधी यांच्या संदर्भात देखील असेच एक भाकीत करण्यात आले आहे. पण हे भाकीत आता नव्हे तर 19993मध्ये करण्यात आले होते. तामिळनाडूमधील ज्योतिषी यागवा यांनी 1993मध्ये भविष्यवाणी केली होती की, प्रियांका गांधी पंतप्रधान होतील.

अर्थात अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या भविष्यवाणी पैकी अनेक खऱ्या होत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. असे असले तरी काही ज्योतिषीच्या भविष्यवाणी खऱ्या होतात. त्यापैकीच एक असलेल्या नवीन खन्ना यांनी 2004मध्ये असे सांगितले होते की, वयाच्या 47व्या वर्षी प्रियांका गांधी देशाच्या पंतप्रधान होतील. विशेष म्हणजे 47व्या वर्षीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळेच खन्ना यांनी केलेल्या भविष्यवाणीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. याच खन्ना यांनी 2009मध्ये नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाचे भविष्यवाणी केली होती, जी नंतर खरी ठरली.

खन्ना यांनी 2004मध्ये असे देखील सांगितले होते की, सोनिया गांधी कधीच पंतप्रधान होणार नाहीत. तर पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातील एक व्यक्ती पंतप्रधान होईल आणि प्रत्यक्षात तसेच झाले. 2004मध्ये डॉ.मनमोहन सिंग PM झाले. अर्थात त्यावेळी त्यांनी केलेल्या अन्य भाकिते खरी ठरली नाही.

निवडणुका जवळ आल्या की राजकीय नेते ज्योतिषांच्याकडे धाव घेतात. पण ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेले अंदाज ज्योतिषांनी सांगितलेल्यापेक्षा अधिक अचूक असतात. असे असले तरी निवडणुकीच्या काळात ज्योतिषांनी सांगितलेल्या भविष्यवाणीबद्दल सर्व सामान्य लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते.

Special Report : उदयनराजे की शिवेंद्रराजे; कोणाला मिळणार 'पॉवर'?

First published: January 28, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading