मराठी बातम्या /बातम्या /देश /

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट मवाळ, सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल नाही!

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट मवाळ, सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल नाही!


शिवाजी पार्कबाबत शिंदे गटाने अजून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नसल्याची माहिती समोर आली

शिवाजी पार्कबाबत शिंदे गटाने अजून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नसल्याची माहिती समोर आली

शिवाजी पार्कबाबत शिंदे गटाने अजून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नसल्याची माहिती समोर आली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. पण, अजून सर्वोच्च न्यायालयात याचिकाच दाखल करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाजी पार्कबाबत शिंदे गटाने अजून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टाची ऑर्डर वकिलांना न मिळाल्याने याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल होण्याची शक्यता कमी आहे. हायकोर्टाच्या ऑर्डरमधील त्रुटी पाहूनच याचिका दाखल केली जाणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं.

ल्या सात दशकांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कधीच प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे यावर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही ना? अशी हमी कोर्टाने मागितली. त्यावर ठाकरे गटाने हमी दिली. त्यानंतर कोर्टाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.

First published: